Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड… डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

Thailand Trip Offer : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! थायलॅंडच्या पर्यटन आणि क्रीडा मंत्र्यांनी परदेशी पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत उड्डाणे सुरु केली आहेत. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2025 | 08:22 AM
व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड... डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

व्वा, आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड... डोमेस्टिक फ्लाइटसाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही

Follow Us
Close
Follow Us:

भारतच नव्हे तर जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक थायलँडला भेट देतात. भारतासह जवळपास 93 देशांच्या नागरिकांना थायलँडमध्ये व्हिसाशिवाय पर्यटनाची संधी उपलब्ध आहे. आता या सोयीबरोबरच थायलँड सरकार पर्यटकांसाठी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे – मोफत देशांतर्गत विमान प्रवास योजना.

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

थायलँडचे पर्यटन व क्रीडा मंत्री सोरावोंग थिएनथोंग यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी मोफत देशांतर्गत विमानसेवेसाठी 700 मिलियन थाई बाट इतक्या निधीचा प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे फक्त राजधानी व मुख्य पर्यटन शहरांपुरते न थांबता, पर्यटकांना देशातील इतर भागांमध्येही आकर्षित करणे.

ही योजना ऑगस्ट ते डिसेंबर 2025 दरम्यान राबवली जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्या विमान कंपन्यांच्या तिकिटांवर सरकारकडून अनुदान दिले जाईल. एकमार्गी प्रवासासाठी 1,750 Baht तर दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठी 3,500 Baht इतक्या दराचे तिकीट सबसिडीवर उपलब्ध होईल. यामुळे देशाच्या पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होईल व अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.

ही योजना सुरुवातीला 6 विमान कंपन्यांसोबत सुरू केली जाणार आहे –

  • थाई एअर एशिया
  • बँकॉक एअरवेज
  • नोक एअर
  • थाई एअरवेज इंटरनॅशनल
  • थाई लायन एअर
  • थाई व्हिएतजेट

या उपक्रमामुळे “अमेजिंग थायलंड ग्रँड टुरिझम अँड स्पोर्ट्स इयर” मोहिमेलाही मोठा फायदा होणार आहे.

थायलंडमधील पाहण्यासारखी टॉप 10 पर्यटनस्थळे

  • बँकॉक – थायलंडची राजधानी आणि आधुनिकतेसोबत परंपरेचं उत्तम मिश्रण.
  • फुकेट – थायलंडमधील सर्वात मोठं व प्रसिद्ध बेट.
  • पटाया – समुद्रकिनारे आणि रात्रजीवनासाठी लोकप्रिय ठिकाण.
  • चियांग माई – शांत आणि सांस्कृतिक वातावरण असलेलं शहर.
  • क्राबी – चुनखडीच्या डोंगररांगा आणि हिरवळीनं वेढलेले सुंदर बीच.
  • कोह समुई – पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय बेट.
  • फी फी आयलंड – निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि जलक्रीडेसाठी उत्तम.
  • अयुत्या – ऐतिहासिक आणि प्राचीन शहर.
  • कंचनबुरी – रमणीय धबधबे आणि क्वाई नदीवरील प्रसिद्ध पूल.
  • पाई – शांत, डोंगराळ आणि निसर्गरम्य शहर.

या योजनेमुळे थायलँडला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार असून पर्यटन क्षेत्राची लोकप्रियता आणखी वाढणार आहे.

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

FAQs (संबंधित प्रश्न)

थायलंडमध्ये तुम्ही देशांतर्गत विमान प्रवास करू शकता का?
थायलंड तुम्हाला देशाच्या बहुतेक भागांशी जोडण्यासाठी अनेक देशांतर्गत विमान कंपन्या चालवते.

थायलंडमध्ये कोणत्या एअरलाईन्स देशांतर्गत उड्डाण करतात?
थाई एअरवेज, थाई एअरएशिया, बँकॉक एअरवेज, थाई लायन एअर, थाई व्हिएतजेट एअर, नोक एअर.

Web Title: Now you can travel thailand for free no need to pay for domestic flights travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Uttarakhand Hill Stations : पंचचुली शिखरांच्या कुशीत वसलेलं स्वर्गीय मुन्सियारी…निसर्गाचा खजिनाच जणू
1

Uttarakhand Hill Stations : पंचचुली शिखरांच्या कुशीत वसलेलं स्वर्गीय मुन्सियारी…निसर्गाचा खजिनाच जणू

Travel Hacks : प्रवास करताना घोटाळ्यांपासून सावध! बनावट गाईड, महाग टॅक्सी आणि फसवी हॉटेल बुकिंग टाळण्यासाठी सोपे उपाय
2

Travel Hacks : प्रवास करताना घोटाळ्यांपासून सावध! बनावट गाईड, महाग टॅक्सी आणि फसवी हॉटेल बुकिंग टाळण्यासाठी सोपे उपाय

Hotel Safety Hack : एकट्या प्रवासातही भीती नको! हॉटेलमध्ये ‘बॉटल ट्रिक’ ठरेल तुमचा सुरक्षा कवच
3

Hotel Safety Hack : एकट्या प्रवासातही भीती नको! हॉटेलमध्ये ‘बॉटल ट्रिक’ ठरेल तुमचा सुरक्षा कवच

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी
4

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.