Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

October Heat: पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरमध्ये दमटपणासह जाणवणाऱ्या उष्णतेला ‘ऑक्टोबर हीट’ म्हटले आहे. या काळात घाम, डिहायड्रेशन, थकवा, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ आणि घामोळे यांसारखे त्रास होऊ शकतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 04:37 PM
October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा (फोटो- सोशलमीडिया)

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर हीटमध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ घ्या.
  • सैल सुती कपडे घाला आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे शक्यतो टाळा.
  • हलके अन्न खा, स्वच्छता राखा आणि घामाने भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका.
पावसाळा संपला की वाटतं आता थंडी सुरू होईल, पण तसं होत नाही. सप्टेंबर शेवट आणि ऑक्टोबरमध्ये एक विचित्र गरमीला सुरुवात होते. त्यालाच ऑक्टोबर हीट असे म्हणतात. पाऊस गेला असतो पण हवेत दमटपणा खूप असतो. घाम येतो पण वाळत नाही. अंगाची लाही लाही होते, जीव घाबरतो आणि याचा परिणाम थेट आपल्या तब्येतीवर आणि त्वचेवर होतो.या दिवसात थोडी जरी निष्काळजीपणा केली तर डिहायड्रेशन, त्वचेवर पुरळ, थकवा, डोकेदुखी असे त्रास सुरू होतात. म्हणून या ऑक्टोबर हीटमध्ये स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

1. भरपूर पाणी प्या, शरीराला थंड ठेवा

ऑक्टोबर हीटमध्ये घाम खूप येतो. घामामुळे शरीरातलं पाण्याच्या पातळी कमी झाल्याने डिहायड्रेशन होते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. तहान लागली तरच पाणी प्यायचं असं करू नका. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहा.

फक्त साधं पाणी नाही तर लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक, कोकम सरबत, जिरे पाणी असं काहीतरी घेत रहा. यामुळे शरीरातलं मीठ पण बॅलन्स राहतं. बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवायलाच हवी. कोल्ड्रिंक आणि चहा-कॉफी जास्त पिऊ नका, त्याने उलट जास्त तहान लागते. October Heat:

2. कपडे कोणते घालायचे याकडे लक्ष द्या

या दिवसात कपड्यांची निवड खूप महत्वाची आहे. घट्ट कपडे, जीन्स आणि नायलॉनचे कपडे अजिबात घालू नका. त्याने घाम अजून जास्त येतो आणि अंगावर पुरळ येतात. नेहमी सुती, कॉटनचे आणि सैलसर कपडे घाला. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि अंगाला हवा लागते. रंग पण महत्वाचा आहे. काळे, निळे असे गडद रंग उष्णता जास्त खेचतात. त्यामुळे पांढरे, फिकट निळा, हलका हिरवा असे फिकट रंगाचे कपडे घाला. ऑफिसला जाताना पण शक्यतो कॉटनचेच कपडे वापरा.

3. खाणं हलकं आणि पाणीदर ठेवा

ऑक्टोबर हीटमध्ये जड जेवण टाळा. तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ले की अजून जास्त उकाडा वाटतो आणि पोट बिघडतं. जेवणात पाणी जास्त असलेली फळं खा. कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी, द्राक्षं ही फळं रोज खा. दही, ताक, कोशिंबीर, पालेभाज्या खा. मांसाहार आणि जास्त तिखट जेवण या दिवसात कमी करा. रात्रीचं जेवण तर एकदम हलकं ठेवा. जेवण वेळेवर घ्या.

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क

4. दुपारी बाहेर जाणं टाळा

दुपारी 12 ते 4 या वेळेत ऊन सगळ्यात जास्त तापलेलं असतं. या वेळेत शक्यतो घराबाहेर जाऊ नका. खूप महत्वाचं काम असेल तरच जा.जायचंच असेल तर छत्री घ्या, डोक्यावर टोपी घाला, डोळ्यावर गॉगल लावा आणि सोबत पाण्याची बाटली ठेवा. लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना या वेळेत बाहेर पाठवू नका. त्यांना उष्माघाताचा त्रास लवकर होतो. बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका, थोडा वेळ थांबा आणि मग पाणी प्या.

5. स्वच्छता पाळा, नाहीतर त्वचा खराब होईल

घामामुळे शरीरावर बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे अंगाला खाज येणे, पुरळ येणे, घामोळे येणे असे त्रास होतात.म्हणून या दिवसात दिवसातून दोन वेळा अंघोळ करा. अंघोळीच्या पाण्यात थोडं कडुलिंबाचं पाणी किंवा तुरटी टाकली तरी चालेल. अंघोळ झाल्यावर अंग पूर्ण कोरडं करा. जास्त सुगंधी साबण किंवा पावडर लावू नका. कपडे रोज बदला. घामाने भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका.

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

ऑक्टोबर हीट फक्त काही दिवसांचा असतो पण या दिवसात तब्येतीची काळजी घेतली नाही तर आजारी पडायला वेळ लागत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्या, हलकं खा, सुती कपडे घाला आणि दुपारच्या उन्हापासून वाचा. थोडी काळजी घेतली की हा ऑक्टोबर हीट पण सहज निघून जाईल.

Web Title: October heat precautions dehydration skin care tips rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Heat Waves
  • lifestlye tips
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
1

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
2

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
3

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
4

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.