आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या 'या' पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. प्रत्येक ऋतूनुसार हवामानात सतत काहींना काही बदल होत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस, थंडी पडत असल्यामुळे आरोग्य बिघडते. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येणे, त्वचा काळी पडणे. केसांमध्ये कोंडा होणे याशिवाय त्वचेच्या इतरही बऱ्याच समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग, मुरूम आणि सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सला बऱ्याचदा खूप जास्त खाज सुटते तर काहीवेळा पिंपल्समधून पाणी किंवा पू येतो. चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. तर काही महागड्या स्किन केअर ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट नाहीतर नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणे आवश्यक आहे. आजीबाईच्या बटव्यातील घरगुती आणि पारंपरिक उपाय त्वचा ग्लोइंग करण्यासाठी मदत करतात. हे उपाय पूर्वीच्या काळापासून केले जात आहेत. ५ ते १० रुपयांच्या पदार्थांचा वापर करून तुम्ही घरीच फेसपॅक तयार करू शकता. फेसपॅक लावल्यामुळे त्वचेच्या भरपूर समस्यांपासून सुटका मिळते आणि त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये पाणी घालून त्यात एक ते दोन डिंक घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ त्वचेवर तसेच ठेवा. त्यानंतर १५ ते २० मिनिटं झाल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. डिंकामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून हायड्रेट आणि थंड करण्यास मदत करते. उष्णतेमुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. डिंक त्वचेला मॉइश्चरायझेशन देते, यासोबतच चेहऱ्यावर आलेले सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते.
मुरुमे, सुरकुत्या आणि टॅनिंग यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डिंक आणि गुलाब पाण्याचा वापर करावा. लिंबाचा रस थेट त्वचेवर लावू नये. यामुळे कोणतेही इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. तसेच डिंकाचे सरबत बनवून प्यायल्यास त्वचेच्या समस्या दूर होतील. भिजवलेले डिंक ग्लासभर पाणयात मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि त्वचा आतून स्वच्छ होईल.






