Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ महिलांनाच नाही, तर तरुण पुरुषांनाही होतोय ‘हा’ सायलेंट आजार; किरकोळ दुखापतीने फ्रॅक्चर होत असल्यास व्हा सावध

ऑस्टिओपोरोसिस हा आजार सामान्यतः महिलांमध्ये, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर होतो, अशी धारणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमच्या ओपीडीमध्ये तरुण पुरुषांमध्येही हाडांची घनता कमी होणे आणि किरकोळ दुखापतींमुळे फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर प्रमाण वाढताना दिसत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 09, 2026 | 06:53 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ऑस्टिओपोरोसिस हा आजार सामान्यतः महिलांमध्ये, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉजनंतर) होतो, अशी धारणा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत आमच्या ओपीडीमध्ये तरुण पुरुषांमध्येही हाडांची घनता कमी होणे (लो बोन डेन्सिटी) आणि किरकोळ दुखापतींमुळे फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर प्रमाण वाढताना दिसत आहे. हा एक चिंतेचा विषय आहे, कारण पुरुषांमधील ऑस्टिओपोरोसिसचे निदान अनेकदा उशिरा होते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, फ्रॅक्चरनंतर गंभीर अपंगत्वाचा धोका वाढू शकतो. याबाबत मोलाचा सल्ला डॉ. वैभव बगारिया,Director, Orthopaedics and Joint Replacement at Sir H.N. Reliance Foundation Hospital, Mumbai यांनी दिला.

सायलेंट डिसीज म्हणजे काय?

जागतिक स्तरावर ५० वर्षांवरील सुमारे सातपैकी एका पुरुषाला आयुष्यात कधीतरी ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. या आजाराची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला अनेकदा “सायलेंट डिसीज” असेही म्हटले जाते. बहुतेकांना एखाद्या किरकोळ पडण्याने किंवा दुखापतीमुळे हाड मोडल्यानंतरच या आजाराची माहिती मिळते. तरुण पुरुषांमध्ये सतत पाठदुखी, वारंवार होणारे स्ट्रेस फ्रॅक्चर, उंची कमी होणे, किरकोळ आघातानंतर मनगट किंवा मणक्याचे फ्रॅक्चर होणे किंवा दुखापतीतून बरे होण्यास जास्त वेळ लागणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

या वाढत्या समस्येमागे कारण काय?

या वाढत्या समस्येमागे अनेक जीवनशैलीशी आणि आरोग्याशी संबंधित कारणे आहेत. दीर्घकाळ बसून राहणे, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, सूर्यप्रकाशाचा अभाव, कमी प्रथिनेयुक्त आहार, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, धूम्रपान, मद्यपान, अतिशय कठोर डाएट पाळणे आणि जंक फूडचे जास्त सेवन या सर्व गोष्टी हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. तसेच नियमित वजन उचलण्याचे व्यायाम न करणाऱ्या तरुणांमध्ये हाडांची आवश्यक घनता विकसित होत नाही किंवा टिकून राहत नाही.

योग्य वैद्यकीय तपासणी आवश्यक

पुरुषांमध्ये विशेषतः तरुण वयात दिसणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसमागे काही विशिष्ट वैद्यकीय कारणेही असू शकतात. याला सेकंडरी ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. व्हिटॅमिन डीची कमतरता, थायरॉइडचे विकार, टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी, स्टेरॉइड औषधांचा दीर्घकालीन वापर, आतड्यांमधील पोषक तत्त्वांचे कमी शोषण, मूत्रपिंडाचे आजार, दाहजन्य संधिवात, मधुमेह किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यांसारखी कारणे यामागे असू शकतात. प्रत्यक्षात, ऑस्टिओपोरोसिस असलेल्या निम्म्याहून अधिक पुरुषांमध्ये असे दुय्यम कारण आढळू शकते. त्यामुळे योग्य वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे गंभीर संकेत असू शकतात

“तरुण पुरुषांमधील ऑस्टिओपोरोसिसला केवळ अशक्तपणा किंवा फिटनेसचा अभाव म्हणून दुर्लक्षित करू नये. किरकोळ पडल्यावर फ्रॅक्चर होणे, वारंवार होणाऱ्या दुखापती किंवा कारण नसताना होणारी पाठदुखी ही हाडांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी गंभीर संकेत असू शकतात. केवळ फ्रॅक्चरवर उपचार करणे पुरेसे नाही, तर हाडे कमकुवत का झाली याचे मूळ कारण शोधणेही तितकेच आवश्यक आहे.”

या समस्येपासून बचाव करण्यासाठी लहान वयापासूनच योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, रेसिस्टन्स ट्रेनिंग, चालणे किंवा खेळांमध्ये सहभाग, पुरेसा सूर्यप्रकाश, कॅल्शियमयुक्त आहार, पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन, व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास योग्य उपचार, धूम्रपान टाळणे आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासण्या आणि आवश्यक असल्यास DEXA बोन डेन्सिटी स्कॅन करून घ्यावा.

Web Title: Osteoporosis in young men symptoms causes and prevention tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • daily health care news
  • lifestlye
  • lifestlye tips
  • lifestyle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.