Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल

अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात लक्षणे दिसून येतात आणि आजाराचे निदान होते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 05:30 AM
ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल

Follow Us
Follow Us:

अंडाशयाच्या कॅन्सरची लागण कशामुळे होते?
अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणे?
कॅन्सर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर पायांखालील जमीन सरकते. गंभीर आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. भारतीय महिलांना प्रामुख्याने सर्व्हायकल आणि स्तनांचा कॅन्सर आणि तिसऱ्या क्रमांकावर अंडाशयाचा कॅन्सर आहे. भारतामध्ये दरवर्षी १,००,००० महिलांमागे अंडाशयाच्या कॅन्सरच्या जवळपास ११.९ केसेस आढळून आल्या आहेत. याशिवाय ५५ ते ६५ वयोगटातील महिलांमध्ये अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक दिसून येते. तर भारतामध्ये २३,००० ते २५,००० नवीन केसेस आढळून येतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीरात लक्षणे दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत

अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालातंराने कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढू लागतात आणि लक्षणे तीव्र होतात. अपचन, ओटीपोटात दुखणे, भूक कमी होणे, बद्धकोष्ठता, ओटीपोटात जडपणा यांसारख्या समस्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये उद्भवतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे. वारंवार पोटात वेदना किंवा ओटीपोटात वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करून घ्याव्यात. जाणून घ्या अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे.

अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात या आजाराचे निदान होते. तो पर्यंत हा आजार ओटीपोटाच्या बाहेर पसरलेला असतो. तसेच ट्युमर डिपॉझिट्स पोटाच्या पोकळीच्या बाहेर सुद्धा आढळून येण्याची जास्त शक्यता असते. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण जंक फूडचे अतिसेवन, अनुवंशिकता इत्यादी कारणांमुळे होण्याची शक्यता असते. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला स्तन, गर्भाशय, मोठे आतडे किंवा मलाशयाचा कॅन्सर झाल्यास पुढील पिढीला या आजाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे शरीराची जास्त काळजी घेणे फार आवश्यक आहे.

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल

अंडाशयाच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे:

  • सतत पोट फुगणे
  • ओटीपोटात सतत तीव्र वेदना होणे
  • लघवीच्या सवयींमध्ये बदल
  • भूक न लागणे
  • वजन झपाट्याने कमी होणे
  • रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव किंवा मासिक पाळीत अनियमितता
  • थकवा अशक्तपणा जाणवणे, वरील कोणतीही लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंडाशयाचा कर्करोग म्हणजे काय?

    Ans: हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो अंडाशयात (जिथे अंडी आणि संप्रेरके - हार्मोन्स तयार होतात) अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे होतो.

  • Que: हा आजार उशिरा का लक्षात येतो?

    Ans: अंडाशय पेल्विसमध्ये मोकळे असतात, त्यामुळे गाठ खूप मोठी होईपर्यंत किंवा आसपासच्या अवयवांवर दाब येईपर्यंत लक्षणे दिसत नाहीत.

  • Que: निदानासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

    Ans: रक्तातील कर्करोगाच्या पेशींची पातळी तपासण्यासाठी, अंडाशयातील गाठ पाहण्यासाठी.

Web Title: Persistent lower abdominal pain major changes in the body after ovarian cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cancer
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
1

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.