मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
तिखट खाण्याची इच्छा झाल्यास काय खावे?
रात्रीच्या वेळी भूक का लागते?
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास काय खावे?
रात्री पोटभर जेवल्यानंतर सुद्धा आपल्यातील अनेकांना भूक लागते. रात्री २ किंवा ३ वाजता जाग आल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते. काहींना गोड पदार्थ खावेसे वाटतात तर काहींना झणझणीत तिखट पदार्थ खाऊसे वाटते. पण रात्री चुकीच्या वेळी खाल्लेल्या पदार्थांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. रात्री खाल्लेले पदार्थ लवकर पचन होत नाही. रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे खाल्लेले अन्न अतिशय हळू पचन होते. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे सकाळी उठल्यानंतर ऍसिडिटी, गॅस आणि पोटात जडपणा जाणवू लागतो. कामाचा ताण, अपुरी झोप, हार्मोन्समधील बदल किंवा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे रात्री कोणत्याही वेळी वेगवेगळे पदार्थ खाण्याची क्रेविंग येतात. सतत जंक फूड खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. वाढलेल्या वजनाचा परिणाम शरीरावर चुकीच्या पद्धतीने होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्री अचानक भूक लागल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक
रात्री झोपेतून उठल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट खावे. डार्क चॉकलेट रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात राहील.
रात्री झोपण्याआधी अनेकांना फळे खाण्याची सवय असते. प्रत्येक घरात कायम कोणते ना कोणते फळ उपलब्ध असते. त्यामुळे रात्री भूक लागल्यानंतर तुम्ही सफरचंद, केळी, पपई किंवा द्राक्षे यांसारखी नैसर्गिक गोडवा असेलली फळे खाऊ शकता. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. दैनंदिन आहारात किंवा भूक लागल्यानंतर फळे खावीत.
रात्री अपरात्री भूक लागल्यानंतर सुका मेवा खावा. काजू , बदाम, खजूर, मनुके इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास वजन वाढण्याऐवजी नियंत्रणात राहील. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सुका मेवा खावा. यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होईल. याशिवाय सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
तिखट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भाजलेले चणे किंवा शेंगदाणे खावे. भाजलेल्या मखणामध्ये लो-कॅलरी असतात. यात कमी मीठ आणि कमी तिखट पदार्थांचा वापर केला जातो. लिंबू पाणी बनवल्यानंतर त्यात काळे मीठ मिक्स करावे. यामुळे पचन आणि हायड्रेशनला मदत होते. रात्री झोपेतून उठल्यानंतर थकल्यासारखे वाटल्यास लिंबू पाणी प्यावे. तसेच रात्री भूक लागल्यानंतर पचनास हलके आणि चविष्ट पदार्थ खावेत. कुरकुरीत भाज्या आणि क्रीमी दह्याचे डिप नमकीन चवीसाठी अतिशय सुंदर लागते. या पद्धतीचे नमकीन तुम्ही रात्रीच्या वेळी सुद्धा खाऊ शकता. कमी फॅट्स आणि हाय फायबर असलेले चविष्ट पदार्थ तिखट खाण्याची इच्छा कमी करतात.
Ans: बऱ्याचदा शरीरात पाण्याची कमतरता असल्याने गोड खावेसे वाटते, त्यामुळे १-२ ग्लास पाणी प्या.
Ans: मानसिक ताण किंवा कंटाळ्यामुळे गोड खाण्याची सवय लागते.
Ans: अंडी, पनीर, डाळी, भाजलेले चणे, मखाणे, बदाम






