Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेती औषध फवारण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या; नाहीतर बेतेल जीवावर!

शेतात औषध फवारताना बहुतांश शेतकरी एका भयंकर आणि जीवघेण्या सवयीला नकळत बळी पडत असतात. फवारणीच्या धावपळीत तंबाखू, मावा किंवा सिगारेटचे सेवन केल्याने हातात असणारे विष थेट शरीरात जाऊन एका क्षणात प्राणावर बेतू शकते, याची कल्पना आहे का?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 03, 2026 | 10:31 AM
शेती औषध फवारण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या; नाहीतर बेतेल जीवावर!
Follow Us
Follow Us:
  • शेतात औषध फवारणी करताना तंबाखू किंवा सिगारेटचे सेवन करणे विषबाधेला थेट आमंत्रण ठरू शकते.
  • हाताला लागलेली घातक रसायने तोंडावाटे शरीरात जाऊन क्षणात शेतकऱ्याच्या जीवावर बेतण्याचा मोठा धोका असतो.
  • सुरक्षेसाठी पूर्ण कपडे, हातमोजे आणि मास्क वापरून फवारणीदरम्यान खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे.

शेतीसाठी आजकाल औषध फवारणी एक नितांत गरज बनत चालली आहे. पण बऱ्याचदा शेतकरी लोक औषध फवारणी करताना आरोग्याच्या दृष्टीने हव्या त्या काळजी घेताना दिसत नाहीत. कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी करताना होणारी छोटीशी चूकही शेतकऱ्याच्या जीवावर बेतू शकते. दरवर्षी विषबाधेमुळे अनेक शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते, तर काहींना प्राण गमवावे लागतात. शेतात औषध फवारताना खबरदारी घेणे अतिशय आवश्यक आहे.याबद्दल आपल्याला कोणकोणत्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे ते इथे पाहूयात.

मावा, तंबाखू आणि सिगारेटची घातक सवय

अनेक शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना औषध फवारणी करत असताना तंबाखू मळण्याची, मावा खाण्याची किंवा सिगारेट/बीडी पिण्याची सवय असते. ही सवय अत्यंत प्राणघातक ठरू शकते,

गाई-म्हशींचेही असतात ‘मूड स्विंग्स’! धार काढताना किंवा चारा टाकताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

  • हातावरील विष पोटात जाते: औषध फवारणी करताना हाताला रासायनिक द्रव लागलेला असतो. त्याच हाताने तंबाखू मळल्यास किंवा तोंडाजवळ हात नेल्यास कीटकनाशकाचे अंश थेट पोटात जातात.
  • धुरावाटे विष श्वासात जाते: सिगारेट किंवा बीडी ओढताना तोंडावाटे हवा वेगाने आत खेचली जाते, ज्यामुळे हवेतील औषधाचे कण थेट फुफ्फुसात जातात.
  • तातडीने विषबाधा: या चुकीच्या सवयींमुळे जागीच चक्कर येणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत जळजळ होणे आणि कधीकधी तीव्र विषबाधा होऊन व्यक्ती बेशुद्ध पडणे असे प्रकार घडतात.
फवारणी करताना घ्यावयाची मुख्य काळजी
  • सुरक्षा किटचा वापर: फवारणी करताना पूर्ण बाह्यांचे कपडे, पायात गमबूट, हातामध्ये रबरी हातमोजे, डोळ्यांवर गॉगल आणि तोंडावर मास्क किंवा रुमाल नक्की बांधा.
  • वाऱ्याची दिशा लक्षात घ्या: नेहमी वाऱ्याच्या दिशेनेच फवारणी करा. वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी केल्यास औषधाची फवारा थेट तुमच्या अंगावर आणि तोंडावर उडतो.
  • खाणे-पिणे पूर्णपणे टाळा: फवारणीचे काम सुरू असताना काहीही खाऊ नका, पाणी पिऊ नका किंवा तंबाखू-सिगारेटचे सेवन अजिबात करू नका.
  • नोजल तोंडाने साफ करू नका: पंपाचे नोजल अडकल्यास ते फुंक मारून साफ करण्याची चूक कधीही करू नका. ते स्वच्छ करण्यासाठी बारीक तारेचा वापर करा.
  • कामावरून आल्यावर स्वच्छता: फवारणी संपल्यानंतर हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा, आंघोळ करा आणि वापरलेले कपडे वेगळे धुवून वाळत घाला.
शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या या 10 अवजड वाहनांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आत्ताच जाणून घ्या

विषबाधा झाल्यास काय करावे?

फवारणीदरम्यान अचानक चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ किंवा अस्वस्थता वाटू लागल्यास फवारणी त्वरित थांबवा. पीडित व्यक्तीला तात्काळ सावलीत आणा, त्याचे कपडे ढिले करा आणि अजिबात उशीर न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे घेऊन जा. सोबत फवारलेल्या औषधाचा डबा नेण्यास विसरू नका.

शेतपिकांचे रक्षण करताना स्वतःच्या आरोग्याचे आणि जीवाचे रक्षण करणे हीच सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे.

Web Title: Precautionary measures before pesticide spraying to prevent poisoning hazards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • agriculture
  • health
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या
1

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या

इंग्रजीत Guava, मग मराठीत ‘पेरू’ का? आपण खातो त्या ‘पेरू’ फळाचा थेट संबंध आहे एका देशाशी! वाचा याचा रंजक इतिहास!
2

इंग्रजीत Guava, मग मराठीत ‘पेरू’ का? आपण खातो त्या ‘पेरू’ फळाचा थेट संबंध आहे एका देशाशी! वाचा याचा रंजक इतिहास!

Janmashtami Rangoli Designs: जन्माष्टमीला अंगणासमोर काढा ‘या’ आकर्षक डिझाईनच्या रांगोळ्या; पाहता क्षणी डिझाईनने जिंकेल मन
3

Janmashtami Rangoli Designs: जन्माष्टमीला अंगणासमोर काढा ‘या’ आकर्षक डिझाईनच्या रांगोळ्या; पाहता क्षणी डिझाईनने जिंकेल मन

दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय
4

दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.