
गर्भधारणा न होण्याची कारणं (फोटो सौजन्य - iStock)
डॉ. महिमा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत अधिक माहिती दिली. एक ३१ वर्षीय जोडपे त्यांच्या क्लिनिकमध्ये आले, ज्यांना लग्नाला पाच वर्षे होऊनही गर्भधारणा होत नव्हती. जेव्हा तज्ञांनी त्यांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास घेतला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महिलेचे सर्व रिपोर्ट्स सामान्य होते, पण असे असूनही गर्भधारणा झाली नव्हती. जोडप्याकडून त्यांच्याबाबत सर्व समजून घेतल्यानंतर, डॉक्टरला एका चाचणीच्या निकालावर संशय आला. त्यानंतर त्यांनी तीच चाचणी पुन्हा करायला सांगितली. पुन्हा केलेल्या चाचणीचे निकाल मिळाल्यानंतर, त्यांना अखेरीस समस्या लक्षात आली.
प्रजनन तज्ज्ञ डॉ. महिमा यांनी सांगितले की, अलीकडेच एक ३१ वर्षीय जोडपे त्यांच्या क्लिनिकमध्ये आले होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती आणि ते गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना यश आले नव्हते. ते पंजाबहून आले होते.
तिने ओव्हुलेशन इंडक्शन (अंडोत्सर्ग प्रेरणा) देखील करून घेतले होते असं त्यांनी नमूद केले. त्या महिलेची मासिक पाळी नियमित होती आणि तिचे ओव्हुलेशन (अंडोत्सर्ग) देखील वेळेवर होत होते. तरीही, तिला गर्भधारणा होत नव्हती. तिच्या हातात एचएसजी (HSG) अहवाल होता, ज्यात तिच्या फॅलोपियन ट्यूब्स (गर्भाशयाच्या नलिका) खुल्या असल्याचे म्हटले होते. कागदावर सर्व काही ठीक दिसत होते.
Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive
डॉक्टर महिमा सांगतात की, जेव्हा त्यांनी अहवाल पाहिला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. त्यांनी यावेळी म्हटले की, त्या महिलेला ही चाचणी मी पुन्हा करायला सांगितली आणि यावर त्या महिलेचं उत्तर होतं की, ‘ज्या चाचणीचा अहवाल आधीच सामान्य आला आहे, ती मी पुन्हा का करू?’ पण डॉक्टरांवर विश्वास ठेऊन, त्या महिलेने नंतर ती चाचणी करून घेतली आणि त्या चाचणीचे रिपोर्ट पुन्हा नेऊन दाखवले
प्रजनन तज्ज्ञांनी सांगितले की, अहवालातून असे दिसून आले की तिच्या फॅलोपियन ट्यूब्स बंद होत्या. या नलिकांमध्येच सामान्यतः स्त्रीबीज आणि शुक्राणू एकत्र येतात. जर दोन्ही नलिका गंभीरपणे खराब झाल्या असतील किंवा बंद असतील, तर नैसर्गिक गर्भधारणा अशक्य होते, कारण शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अंदाजे २५ ते ३५% महिला वंध्यत्वाची प्रकरणे नलिकांच्या आजारामुळे होतात. यामुळेच त्या महिलेला गर्भधारणा होत नव्हती. अशी अनेक प्रकरणं महिलांच्या बाबतीत असू शकतात. त्यामुळे जेव्हा महिलांना अशा समस्या असतील तेव्हा अशा योग्य डॉक्टरांच्या गरज भासते जे मूळ समस्या शोधून काढू शकतील. यानंतर या महिलेच्या गर्भधारणेसाठी पुढील प्रक्रिया डॉक्टरांनी पूर्ण केली.
Pregnancy मध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास होते नॉर्मल डिलिव्हरी? काय आहे तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा