
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी घरीच तयार करा नॅचरल फेसवॉश, आठवडाभरात त्वचा होईल स्वच्छ
धूळ, माती आणि प्रदूषणामुळे चिकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी महिला वेगवेगळ्या फेस वॉशचा वापर करतात. फेसवॉश वापरल्यामुळे त्वचा स्वच्छ होते, असे सगळ्यांचं वाटते. पण चुकीच्या फेसवॉशचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्याऐवजी आणखीनच निस्तेज होते आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स, बारीक मुरूम आणि गर्मीमुळे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले उष्णतेचे फोड आणि पिंपल्स कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत राहतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर केला जातो. पण ऑयली स्किन आणि काळवंडलेल्या चेहऱ्यावर सूट न होणारे फेसवॉश लावल्यास त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वारंवार केलेल्या ट्रीटमेंटमुळे कालातंराने त्वचेचे गंभीर नुकसान होते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर सतत स्किन केअरमधील प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो. घरगुती पदार्थांमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास उन्हामुळे त्वचेवर जमा झालेली घाण, पिंपल्स आणि मुरुमाचे बारीक फोड नष्ट होण्यास मदत होईल. त्यामुळे बाजारात विकत मिळणारे फेसवॉश वापरण्याऐवजी घरातील पदार्थांचा फेसवॉश म्हणून वापर करावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या आतून स्वच्छ होण्यास मदत होईल.
त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कोणतेही स्किन केअर करण्याआधी त्वचा स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी होतो आणि त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. फेसवॉश बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरवे मूग , चणा डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ इत्यादी पौष्टिक पदार्थांचा वापर करावा. मिक्सरच्या भांड्यात हिरवे मूग , चणा डाळ, तांदूळ आणि मसूर डाळ एकत्र करून बारीक पावडर करून घ्यावी. तयार केलेली बारीक पावडर चमचाभर हातांवर घेऊन गुलाब पाणी किंवा मधात मिक्स करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला फेसवॉश त्वचेवर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करते. तांदळाचा वापर केल्यामुळे त्वचेचा काळवंडलेला रंग उजळदार होतो आणि चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते. चण्याची डाळ नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून वापरली जाते. चेहऱ्यावर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. मसूर डाळीच्या वापरामुळे मृत पेशी नष्ट होतात. नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून चणा डाळीचा वापर केला जातो.