Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या चहासोबत नेहमीचे पोहे, भजी किंवा बिस्किट खाऊन कंटाळा आला असेल, तर चिली पोटॅटो हा चटपटीत पर्याय ठरू शकतो. बटाट्यांना कॉर्नफ्लोअरचा थर देऊन कुरकुरीत तळले जाते. त्यानंतर कांदा, ढोबळी मिरची, गाजर, हिरवी मिरची आणि शेझवान सॉससह तयार केलेल्या मसालेदार सॉसमध्ये हे बटाटे मिक्स केले जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 12:20 PM
Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बटाट्यांना कॉर्नफ्लोअर लावून कुरकुरीत तळा
  • शेझवान सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगरने तयार करा चटपटीत सॉस
  • सॉसमध्ये बटाटे जास्त वेळ शिजवू नका; कुरकुरीतपणा टिकवा
 

Chilli Potato Easy Recipe : संध्याकाळ झाली की चहासोबत आपल्या पोटातील छोट्याशा भूकेला काहीतरी खावेसे वाटते. परंतू पोहे, भजी किंवा बिस्कीट खावून कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी गरम, चवीला तिखट, आंबट आणि थोडी गोड खाण्याची इच्छा होते. तर मग आत्ताच करा चिली पोटॅटो जे चवीलाही मस्त आणि पूर्ण पदार्थ होईल काही मिनीटांमध्ये फस्त. Chilli Potato Recipe:

कसा तयार करायचा तर…

साहित्य

दोन मध्यम आकाराचे बटाटे
दोन चमचे कॉर्नफ्लोअर
एक कांदा
एक ढोबळी मिरची
एक छोटे गाजर
दोन- तीन हिरव्या मिरच्या
एक चमचा आले-लसूण पेस्ट
पाच ते सहा चमचे शेझवान चटणी
अर्धा चमचा टोमॅटो सॉस
एक चमचा व्हिनेगर
थोडी काळी मिरी
चवीनुसार मीठ
तेल

कृती

सुरुवातीला बटाटे सोलून घ्या आणि त्यांचे लांबट तुकडे करा. हे तुकडे पाण्याने नीट धुवून घ्या. त्यानंतर कापडाने किंवा टिश्यूने त्यातील पाणी पूर्णपणे काढणे महत्त्वाचे आहे. बटाटे ओले राहिले तर कॉर्नफ्लोअर नीट चिकटणार नाही.

आता बटाट्यांवर कॉर्नफ्लोअर पसरवा आणि प्रत्येक तुकड्याला त्याचा हलका थर लागेल असा हाताने मिक्स करा. कढईत तेल तापवून बटाटे थोडे थोडे करून सोडा. ते छान सोनेरी रंगाचे आणि कडक होईपर्यंत तळा. तयार झालेले तुकडे टिश्यूवर काढून ठेवा, म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल.

सॉसची तयारी

आता दुसरी कढई घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा. सर्वात आधी हिरवी मिरची आणि कांदा टाका. त्यानंतर गाजर व ढोबळी मिरची घालून मोठ्या आचेवर पटकन परता. भाज्या पूर्ण नरम करण्याची गरज नाही. त्यांचा थोडा कडकपणा राहिला तर चिली पोटॅटोची चव आणखी छान लागते.

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

भाज्यांना हलका रंग आला की त्यात आले-लसूण पेस्ट घाला. काही सेकंद परतल्यानंतर शेझवान सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर मिसळा. त्यावर काळी मिरी आणि थोडे मीठ घाला. हे मिश्रण चांगले हलवत काही वेळ शिजू द्या. सॉसचा सुगंध आला की समजा मसाला तयार झाला.

आता तळलेले कुरकुरीत बटाटे कढईत टाका. सॉस प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हलक्या हाताने सर्वकाही एकत्र करा. जास्त वेळ शिजवू नका, कारण तसे केल्यास बटाट्यांचा कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो.

स्वर्गापेक्षाही सुंदर! ढगांच्या कुशीत वसलंय हे सुंदर गाव, थांबी व्ह्यू पॉइंटवरून दिसतं कांचनजंगाचं अद्भुत रूप

गरमागरम चिली पोटॅटो लगेच प्लेटमध्ये काढा आणि वरून थोडी कोथिंबीर किंवा बारीक चिरलेला कांदा घातला तरी छान दिसतो. संध्याकाळच्या चहासोबत, छोट्या पार्टीसाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा पदार्थ सहज करता येतो.

(टीप- बटाट्यांना जर मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्याने त्यांना लवकर काळपट रंग येत नाही. तसेच मिठामुळे जंतू पूर्णपणे मरुन जातात.)

Web Title: Prepare piping hot chilli potato for your evening snack right now here is the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • food recipe
  • lifestyle news
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी
1

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा
2

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
3

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा
4

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.