(फोटो सौजन्य: Pinterest)
जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
सिक्कीमधील स्वर्ग
भारताच्या सिक्कीम राज्यातील पूर्व जिल्ह्यात वसलेल्या या सुंदर आणि लहान गावाचे नाव आहे जुलूक. इथले दृष्य इतके सुंदर आहे की ते पाहून तुम्हाला स्वर्गाची आठवण होऊ लागेल. ढगांवर वसलेले हे गाव समुद्रसपाटीपासून 10,000 फूट उंचीवर वसले आहे. कुटुंबासोबत फिरण्यासाठी तुम्ही जुलूक गावाची ट्रिप प्लॅन करु शकता. शहराच्या गजबटापासून दूर एका शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरु शकते.
जुलूकमध्ये काय एक्सप्लोर करु शकतो
थंबी व्हू पाॅईंट
थंबी व्ह्यू पॉइंटवरून कांचनजंगा शिखरे स्पष्टपणे दिसतात, कारण ते फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठी गर्दी करतात.
नाथांग व्हॅली
नाथांग व्हॅलीवरुन ढगांचे विहंगम दृष्य दिसते. इथे गेल्यावर असं वाटत जणू आपली पाऊले ढगांवर विहार करत आहेत. सिक्कीम राज्यातील ऐतिहासिक जुन्या रेशीम मार्गावर वसलेली ही एक सुंदर दरी आहे.
एलीफंट लेक
जुन्या सिल्क रोडवर तुम्हाला फक्त ढग नाही तर एलीफंट लेक देखील पाहायला मिळणार आहे. याला कुपूप सरोवर किंवा बिटांग चो असेही म्हटले जाते. या तलावाचा आकार काहीसा हत्तीसारखा आहे.
भारतीय असूनही देशाच्या या 4 भागांमध्ये मिळत नाही डायरेक्ट एंट्री, पाय ठेवताच घ्यावी लागते खास परमिशन
जिग जॅग रस्ते
जुलूकला भेट देण्याचा विचार करत असाल तर इथल्या रस्त्यांची सैर तुम्ही निश्चितच करायला हवी. इथले जिग जॅग रस्ते प्रवासाचा आनंद आणि रोमांच आणखी वाढवतात. रोड ट्रिप करताना बाजूने जाणाऱ्या अनेक निसर्गमय दृष्यांचे तुम्ही साक्षीदार होऊ शकता. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचा काळ इथे फिरायला जाण्यासाठी बेस्ट मानला जातो.






