
अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा कच्च्या टोमॅटोची चटणी
आंबटगोड चवीचा टोमॅटो जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. टोमॅटोची आमटी, टोमॅटोची कढी, चटणी, चाट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. बऱ्याचदा घरात कच्चे टोमॅटो विकत आणले जातात. कच्चे टोमॅटो पिकल्यानंतर त्यांचा जेवणासाठी वापर केला जाती. पण बऱ्याचदा खूप जास्त कच्चे टोमॅटो विकत आणल्यानंतर त्यापासून नक्की काय बनवावं सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्च्या टोमॅटोचा वापर करून अस्सल गावरान पद्धतीमध्ये चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कच्च्या टोमॅटोची आंबट गोड तिखट चटणी गरमागरम चपाती, भाकरी किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा अतिशय सुंदर लागते. महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागात टोमॅटोची चटणी बनवली जाते. सकाळच्या घाईमध्ये भाजी काय बनवावी नेमकं सुचत नाही. अशावेळी घरात उपलब्ध असलेल्या कच्च्या टोमॅटोची चटणी बनवावी. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)