२० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा स्ट्रीट स्टाईल रगडा चाट
सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात काहींना काही चटकदार आणि चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी बाहेरून विकत आणलेले चाट किंवा पाणीपुरी खाल्ली जाते. पण कायमच प्रक्रिया केलेले आणि शिळे अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत. ताज्या आणि घरी बनवलेल्या पदार्थांमध्ये योग्य प्रमाणात मसाले आणि इतर सर्वच पदार्थ टाकले जातात. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी स्ट्रीट स्टाईल रगडा चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड चिंच चटणी आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेली रेसिपी चवीला अतिशय सुंदर लागते. रगडा चाट तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. स्वच्छ पद्धतीने बनवलेली रगडा चाट चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे कायमच बाहेरील विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रगडा चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
बोरिंग पोहे सोडा, यंदा नाश्त्याला बनवा विदर्भ स्टाईल झणझणीत ‘तर्री पोहे’, सकाळचा नाश्ता होईल रंगतदार






