
केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत
वाढते प्रदूषण, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, चुकीची जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. केसांची काळजी घेण्यासाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशरचा वापर करतात. घनदाट आणि मजबूत केसांसाठी सतत नवनवीन ब्रँडचे शाम्पू आणून केसांवर लावले जातात. तर कधी हेअर सीरम, हेअर पॅक, हेअर मास्क लावून केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. केसांची काळजी घेताना वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय सुद्धा करावेत.(फोटो सौजन्य – istock)
Hair Fall: केस गळतीने त्रस्त आहात? आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश; काही दिवसांत दिसेल फरक
केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने केसांमध्ये टक्कल पडण्यास सुरुवात होते. केसांची काळजी घेण्यासाठी सल्फेट आणि पॅराबेनसारखे केमिकल्स केसांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट करुन टाकतात. त्यामुळे कायमच केमिकल्स असलेल्या शाम्पूचा वापर करण्याऐवजी आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पूचा वापर करावा. आयुर्वेदिक पदार्थ केसांच्या मुळांना कोणतीही हानी पोहचवत नाहीत. याउलट केस अतिशय मजबूत आणि घनदाट करण्यास मदत करतात. नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास केस लांबसडक, काळेभोर आणि घनदाट होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया आयुर्वेदिक शाम्पू बनवण्याची कृती.
तयार केलेला शाम्पू बाटलीमध्ये भरुन ठेवा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस स्वच्छ करण्यासाठी शाम्पूचा वापर करावा. शाम्पू लावल्यानंतर २ ते ३ सेंकद हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा, टाळुवर वाढलेले इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. यामध्ये असलेल्या आवळा, शिकाकाई, मेथी इत्यादी पदार्थांमुळे केसांना आवश्यक पोषण मिळेल आणि केस घनदाट होण्यास मदत हाेईल.