Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चूल, चिकन आणि जिवाभावाचे मित्र; ग्रामीण भागातील ‘रानपार्टी’ची वाढती क्रेझ!

मोकळी ताजी हवा, झाडांची थंडगार सावली आणि विहिरीचे पाणी यांच्या सोबतीने पत्रावळीवर वाढलेलं किंवा घरून आणलेल्या ताटात ते गरमागरम, झणझणीत वशाठ जेवताना मन जे तृप्त होऊन समाधान मिळत, ते कुठेही पैशान विकत मिळू शकत नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 29, 2026 | 10:20 PM
चूल, चिकन आणि जिवाभावाचे मित्र; ग्रामीण भागातील ‘रानपार्टी’ची वाढती क्रेझ!
Follow Us
Follow Us:

आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या युगात वीकेंडला एखाद्या मोठ्या चकचकीत हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जाऊन पार्टी करणे ही शहरांमधील एक नवीन फॅशन झाली आहे. पण आपल्या ग्रामीण भागात, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील तरुणाईसाठी फेमस असणारी पार्टीची एक वेगळीच, अस्सल आणि मनाला भिडणारी गावरान व्याख्या आहे. ती म्हणजे सर्व मित्रांनी एकत्र येऊन साजरी केलेली ‘रानपार्टी’ किंवा शेतातली चूल पार्टी! मित्रांचा हक्काचा ग्रुप, दुचाकींवर पाठीमागे बांधलेली मोठी भांडी, घरून चोरून आणलेला तिखट-जाळ मसाला, चिकन मसाला ,चटणी आणि सगळ साहित्य आणि निसर्गाचे मोकळे सानिध्य… हा अनुभव जगातील कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधील महागड्या जेवणापेक्षा कित्येक पटीने भारी आणि आनंद देणारा असतो.

रानपार्टीची तयारी

या रानपार्टीची खरी सुरुवात होते ती वीकेंडच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच. “या रविवारी शेतात पार्टी करायची, जेवायला जायचं!” असं व्हॉट्सॲप ग्रुपवर ठरलं की मग प्रत्येकाकडे एक स्पेशल जबाबदारी सोपवली जाते. कुणीतरी घरच्यांची नजर चुकवून ताजे वाटलेले खडे मसाले आणतं, कुणी अस्सल चिकनची सोय करतं, तर कुणी घरची मोठी अल्युमिनियमची भांडी, तेल आणि चूल पेटवण्यासाठी सुकी लाकडं गोळा करण्याची महत्त्वाची ड्युटी घेतं. गावाबाहेरच्या एखाद्या जुन्या विहिरीशेजारी, एखाद्याच्या शेतात, गोठ्याच्या शेडमध्ये किंवा नदीकाठच्या शांत ठिकाणी या पार्टीसाठी हक्काची जागा निवडली जाते.

‘नो कॅप’ ते ‘स्ले’! आजच्या Gen Z तरुणाईच्या या आहे काही भन्नाट ट्रेंडी स्लँग्स! एका क्लिकवर पाहून घ्या

शेतावरची धमाल आणि चुलीवरच जेवण

नियोजित जागेवर पोहोचल्यावर तिथली खरी धमाल सुरू होते. इथे हॉटेलसारखा कोणताही ऑर्डर घेणारा वेटर किंवा आचारी नसतो, तर प्रत्येक मित्र स्वतःला मोठा शेफ समजू लागतो. शेतातल्या तीन दगडांची चूल मांडून, त्यावर लाकडांचा जाळ करून जेव्हा चिकन शिजायला लागतं, तेव्हा सुटणारा तो खमंग सुवास अख्ख्या रानात पसरतो. कुणी कांदा-टोमॅटो चिरण्यात व्यस्त असतं, कुणी चूल फुंकण्यात, तर कुणी काहीही काम न करता फक्त फुकटचे सल्ले देण्यात मग्न असतं. मोबाईलचे नेटवर्क नसलेल्या या निसर्गाच्या कुशीत, एकमेकांच्या टाळ्या घेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चाललेल्या गप्पा म्हणजेच या मैफलीचा खरा आत्मा असतो.

चुलीवरच्या पार्टीची अनोखी संस्कृती

महाराष्ट्रात तर  या अनोख्या संस्कृतीला फार पूर्वीपासून खूप मोठे स्थान लाभले आहे. सुट्ट्यांमध्ये शहरातून गावात येणाऱ्या नोकरदार किंवा शिकणाऱ्या मित्रांसाठी हा सर्वात मोठा सेलिब्रेशनचा आणि एकत्र येण्याचा मार्ग असतो.  दुपारच्या वेळेला मोकळी ताजी हवा, झाडांची थंडगार सावली ;तर रात्रीच्या वेळेला शांत थंडगार वातावरण यांच्या सोबतीने पत्रावळीवर वाढलेलं किंवा घरून आणलेल्या ताटात ते गरमागरम, झणझणीत वशाठ जेवताना मन जे तृप्त होऊन समाधान मिळत, ते कुठेही पैशान विकत मिळू शकत नाही.

कंदील आणि डमरू घेऊन भल्या पहाटे यायचा हा ‘पिंगळा’! भविष्य सांगायचा,उपदेश करायचा आणि दिस उजडायच्या आधी निघून जायचा!

फक्त जेवणाचा नव्हे; तर मैत्रीच्या जिव्हाळ्याचा सोहळा

थोडक्यात सांगायचे तर, ही रानपार्टी केवळ खाण्यापिण्याचा किंवा भूक भागवण्याचा कार्यक्रम नसून, ती मैत्रीची वीण अधिक घट्ट करणारा एक जिव्हाळ्याचा सोहळाच म्हणायला पाहिजे. हॉटेलच्या बंद एसी रूमपेक्षा मातीच्या सुगंधात आणि जिवाभावाच्या मित्रांच्या गोतावळ्यात साजरी होणारी ही ‘गावरान पार्टी’ प्रत्येकाला मनातून तृप्त करते. म्हणूनच, ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही रानपार्टी म्हणजे केवळ दुपारचे किंवा रात्रीचे जेवण नसून, आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावी अशी एक अत्यंत सुंदर आणि गोड आठवण ठरते.

Web Title: Raanparty of rural maharashtra lifestyle food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • food
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
2

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
3

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.