Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माहिममधील रहेजा हॉस्पिटलकडून ब्रह्मकुमारी संस्थेसाठी महिला दिनानिमित्त आरोग्यासंबंधित चर्चा, मेडिटेशन सत्राचे आयोजन

ब्रह्मकुमारी संस्थेच्या दादर व माहिम शाखेच्‍या प्रमुख दीदी उईवाला यांनी सन्‍माननीय अतिथी म्‍हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर उपस्थितांसाठी मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2025 | 02:38 PM
रहेजा हॉस्पिटलकडून ब्रह्मकुमारी संस्थेसाठी महिला दिनानिमित्त आरोग्यसंबंधित चर्चा, मेडिटेशन सत्राचे आयोजन

रहेजा हॉस्पिटलकडून ब्रह्मकुमारी संस्थेसाठी महिला दिनानिमित्त आरोग्यसंबंधित चर्चा, मेडिटेशन सत्राचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:

८ मार्चला जगभरात सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा समाजात आदर, सन्मान वाढवण्यासाठी सगळीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामाचा वाढलेला तणाव, सतत घरातील कामे, अपूरी झोप, हार्मोनचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसुन येतो. यामुळे महिलांचे मानसिक संतुलन बिघाडून जाते. मसिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणारे मूड स्विंग आणि प्रजनन समस्या, वाढलेले वजन, अनियमित मासिक पाळी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे रोजच्या धावपळीमधून थोडा वेळ महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे.

पिंपल्सने भरलेले चेहरा एका रात्री स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचा होईल कायमची स्वच्छ आणि सुंदर

आंतरराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्त एस.एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम – फोर्टिस सहयोगी हॉस्पिटलने ब्रह्मकुमारी संस्थेसाठी आरोग्यसंबंधित चर्चेचे आयोजन केले. या उपक्रमाचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करण्‍याचा आणि त्यांना जीवनाच्या सर्व टप्प्यांवर दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यास प्रेरित करण्‍याचा मनुसबा होता. माहिम येथील एस.एल. रहेजा हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टण्‍ट-ग्‍यानेकोलॉजिकल सर्जिकल ऑन्‍कोलॉजिस्‍ट डॉ. वृंदा करंजगावकर यांनी 60 हून अधिक उपस्थितांसाठी सत्राचे आयोजन केले. जागरूकता मोहिमेत महिलांच्या आरोग्यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, जसे स्त्रीरोगविषयक समस्या, स्तनाचा कर्करोग, इत्यादी. त्यानंतर, उपस्थितांसाठी मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.

ब्रह्मकुमारी संस्थेच्या दादर व माहिम शाखेच्‍या प्रमुख दीदी उईवाला यांनी सन्‍माननीय अतिथी म्‍हणून उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माहितीपूर्ण चर्चा आणि मार्गदर्शनपर चिंतनाच्‍या माध्‍यमातून या इव्‍हेण्‍टमध्‍ये महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी लवकर निदान, प्रतिबंधात्मक काळजी आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व निदर्शनास आणण्‍यात आले.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन, पोटात साचलेली घाण होईल स्वच्छ

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एस. एल. रहेजा हॉस्पिटल माहिम – फोर्टिस सहयोगी हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल पुनामिया म्‍हणाले, ”महिलांमधील आरोग्यसेवेला योग्य महत्त्व दिले पाहिजे, कारण प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सर्व वयोगटातील महिलांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावते. एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये आम्ही महिलांना प्रभावित करणाऱ्या गंभीर आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिद्ध आहोत. हे सत्र महिलांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल आहे.”

Web Title: Raheja hospital in mahim organizes health related discussion and meditation session for brahma kumaris on womens day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • international women's day

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
4

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.