सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ओव्याचे पाण्याचे सेवन
दैनंदिन आयुष्यात जगताना निरोगी आरोग्यासाठी सतत काहींना काही करत असतात. मात्र वातावरणात होणारा बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, चुकीच्या वेळी झोपणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे पोटात दुखणे, अपचन, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी घातक ठरते.(फोटो सौजन्य – iStock)
लघवी करताना जळजळ होते? किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
प्रत्येकाच्या घरात ओवा हा पदार्थ असतोच. ओवा खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह आणि पोटॅशियम इत्यादी पौष्टिक घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आतड्यांचे कार्य सुधारेल.
वाढलेले वजन, लठ्ठपणा इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. याशिवाय या पाण्याच्या सेवनामुळे चयापचय वाढतो, ज्यामुळे पोटावर आणि हातांवर वाढलेला चरबीचा घेर जळून जाण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले मल बाहेर पडून जातो. याशिवाय यामध्ये असलेले फायबर शरीराची भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. पचनक्रिया बिघडल्यानंतर ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे.
साथीचे आजार किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन करावे. ओव्याच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती झपाट्याने वाढते. गंभीर आजार आणि साथीच्या आजारांपासून सुटका मिळ्वण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे.
किडनी खराब झाल्यानंतर किती वेळ जगू शकतो माणूस? खराब होण्याअगोदर दिसतात ‘ही’ लक्षणे
रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. ओव्याचे पाणी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करते.