Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2025 : तोंडात टाकताच विरघळणारे गोड मोतीचूर लाडू घरी कसे तयार करायचे? गोड सणाची गोड रेसिपी!

Motichoor Ladoo Recipe : मोतीचूर लाडू हे फक्त गोड पदार्थ नसून, ते भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. घरच्या घरी बनवलेले मोतीचूर लाडू अधिक स्वादिष्ट आणि शुद्ध असतात. याची रेसिपी फार सोपी आणि सहज बनणारी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2025 | 01:47 PM
Raksha Bandhan 2025 : तोंडात टाकताच विरघळणारे गोड मोतीचूर लाडू घरी कसे तयार करायचे? गोड सणाची गोड रेसिपी!

Raksha Bandhan 2025 : तोंडात टाकताच विरघळणारे गोड मोतीचूर लाडू घरी कसे तयार करायचे? गोड सणाची गोड रेसिपी!

Follow Us
Close
Follow Us:

यंदा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. बहीण-भावाच्या नात्याला समर्पित हा दिवस हिंदू धर्मातील एक खास सण आहे. आता सण म्हटलं की आपल्या घरी गोडाचे पदार्थ हे आलेच… बहुतेकवेळी आपण हे पदार्थ बाहेरून खरेदी करतो पण मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेले हे पदार्थ नेहमीच फ्रेश असतात असे नाही अशात हे पदार्थ घरीच बनवलेले बरे… भारतीय मिठाईमध्ये मोतीचूर लाडू हे एक खास स्थान असलेले पारंपरिक आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे.

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचनक्रिया राहील कायमच निरोगी

सण-उत्सव, विवाह समारंभ किंवा पूजेच्या प्रसंगी मोतीचूर लाडवांशिवाय गोडाचं पूर्णत्व होत नाही. हे लाडू छोटे, सुंदर मोत्यांसारख्या बूँदीपासून बनवले जातात, म्हणूनच यांना मोतीचूर लाडू म्हणतात. हे लाडू सौम्य सुवासिक, मऊसर आणि तोंडात वितळणारे असतात. अनेकांना हे लाडू खायला फार आवडता. हे लाडू घरीच बनवून तुम्ही घरातील सर्वांनाच खुश करू शकता, शिवाय हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत ज्यामुळे यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याचीही गरज नाही. चला तर मग लगेच जाणून घेऊया मोतीचूर लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • बेसन (हरबरा पीठ) – 1 कप
  • पाणी – सुमारे ¾ कप (Consistency साठी आवश्यकतेनुसार)
  • केशरी/ऑरेंज फूड कलर – थोडासा (ऐच्छिक)
  • तेल/तूप – तळण्यासाठी
  • बूँदी करायची झारी (छिद्र असलेली झारा)
  • साखर – 1 कप
  • पाणी – ½ कप
  • वेलदोड्याची पूड – ½ टीस्पून
  • केशर – काही धागे (ऐच्छिक)
  • गुलाब जल / केवडा जल – ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • तूप – 2 टेबलस्पून
  • बदाम/पिस्ता – सजावटीसाठी (ऐच्छिक)
वजन वाढतंय पण तोंडाचे चोचले पुरवायचेत? मग घरी बनव चविष्ट आणि कुरकुरीत असा Diet Chivda

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, थोडं फूड कलर आणि पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा. त्यात गाठी नसाव्यात याची काळजी घ्या.
  • एका खोलगट कढईत तेल गरम करा. झाऱ्यावर पीठ ओतून छोटे छोटे थेंब गरम तेलात सोडा. बूँदी हलकी
  • खरपूस झाली की बाहेर काढा. सगळी बूँदी अशीच तयार करा.
  • एका पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून मध्यम आचेवर 1 तार पाक होईपर्यंत उकळा. त्यात वेलदोडा पूड, केशर आणि गुलाब जल घाला.
  • तळलेली बूँदी तयार साखर पाकात घालून 10-15 मिनिटं मुरू द्या.
  • बूँदी थोडी थंड झाली की त्यात तूप घालून नीट मिक्स करा. मग हातावर थोडं तूप लावून मध्यम आकाराचे लाडू वळा.
  • वरील बाजूस बदाम/पिस्ता लावून सजवा.
  • लाडू वळताना मिश्रण फार गरम किंवा खूप थंड नसावं.
  • बूँदी योग्य आकाराची यावी यासाठी झाऱ्याची निवड योग्य करा.
  • साखर पाकात थोडा केशर घातल्यास रंग आणि चव दोन्ही वाढते.

FAQs (संबंधित प्रश्न)

मोतीचूर लाडूची खासियत काय आहे?
साखरेच्या पाकात भिजवलेल्या बेसनाच्या पिठाचे छोटे मोती जे गोल आकारात गुंडाळले जातात, याची चव तोंडात टाकताच विरघळली जाते.

लाडू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागतात का?
जर तुम्हाला तुमचे लाडू जास्त काळ टिकायचे असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवणे फायद्याचे ठरेल.

Web Title: Raksha bandhan 2025 special tasty and sweet motichoor ladoo recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • marathi recipe
  • Raksha Bandhan
  • sweet dish

संबंधित बातम्या

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
1

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
2

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
3

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
4

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.