Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव कार्डिओमायोपॅथी (HOCM) हा एक अनुवांशिक (आनुवंशिक) हृदयविकार होता. ज्यामध्ये हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड आणि कडक होतात आणि या स्नायूंच्या जाडीमुळे मुख्यत्वे हृदयातून रक्त बाहेर पडणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 11:45 AM
नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

Follow Us
Follow Us:

नवी मुंबई : गंभीर हृदयविकाराने त्रस्त असलेल्या ७१ वर्षीय महिलेवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रथमच ‘अल्कोहोल सेप्टल अॅब्लेशन’ (Alcohol Septal Ablation) ही अत्याधुनिक, मिनिमली इन्व्हेसिव्ह उपचारपद्धती यशस्वीपणे करण्यात आली. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. केशव काळे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पार पडली. या उपचारामुळे उच्च जोखमीची ओपन हार्ट सर्जरी टळली असून रुग्णेला सुरक्षितपणे आराम मिळाला आहे.(फोटो सौजन्य – istock)

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

नेरूळ येथील ७१ वर्षीय श्रीमती विमल शिंदे (नाव बदलले आहे) या गेल्या काही वर्षांपासून हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी (HOCM) या गंभीर हृदयविकाराने त्रस्त होत्या. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, तीव्र थकवा आणि चालताना अडचण अशा लक्षणांमुळे त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले होते. सर्व औषधोपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अगदी घरातील किरकोळ कामं किंवा थोडे अंतर चालणेही त्यांच्यासाठी आव्हानात्मक झाले होते.

डॉ. केशव काळे म्हणाले, रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव कार्डिओमायोपॅथी (HOCM) हा एक अनुवांशिक (आनुवंशिक) हृदयविकार होता. ज्यामध्ये हृदयाचे स्नायू असामान्यपणे जाड आणि कडक होतात आणि या स्नायूंच्या जाडीमुळे मुख्यत्वे हृदयातून रक्त बाहेर पडणाऱ्या मार्गात अडथळा निर्माण होतो (ऑब्स्ट्रक्शन), ज्यामुळे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पंप करणे कठीण होते. त्यामुळे छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे, हृदयाचे अनियमित ठोके, बेशुद्ध पडणे, हृदय निकामी होणे किंवा अचानक मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो.

इकोकार्डिओग्राम, अँजिओग्राफी आणि कार्डियाक एमआरआयसारख्या तपासण्यांमध्ये रुग्णाच्या हृदयातील लेफ्ट व्हेंट्रिक्युलर आउटफ्लो ट्रॅक्ट (LVOT) मध्ये १०० मिमी एचजीपेक्षा जास्त दाबाचा गंभीर अडथळा असल्याचे आढळून आले. सर्व औषधोपचार करूनही हा अडथळा कायम होता. सुरुवातीला ‘सेप्टल मायेक्टॉमी’ ही ओपन हार्ट सर्जरी करण्याचा विचार करण्यात आला. मात्र रुग्णाचा वय व इतर आजार तसेच गंभीर शस्त्रक्रियेचा धोका लक्षात घेता हा पर्याय अत्यंत धोकादायक होता.

याबाबत डॉ. काळे म्हणाले, रुग्णाची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे आम्ही अल्कोहोल सेप्टल अॅब्लेशन ही दुर्मिळ आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक उपचारपद्धती निवडली. ही प्रक्रिया नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रथमच करण्यात आली. भूल देऊन करण्यात आलेल्या या उपचारात हृदयातील जाड झालेल्या स्नायूंना रक्तपुरवठा करणारी विशिष्ट धमनी शोधून त्यामध्ये नियंत्रित प्रमाणात ९५ टक्के अल्कोहोल इंजेक्ट करण्यात आले. यामुळे त्या भागातील स्नायूंची जाडी कमी होऊन रक्तप्रवाह सुधारण्यास मदत झाली.

उपचारादरम्यान अतिरिक्त सुरक्षेसाठी तात्पुरता पेसमेकरही बसविण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रक्रियेनंतर हृदयातील अडथळ्याचा दाब जवळपास ७० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. कोणतीही गंभीर गुंतागुंत न होता रुग्णेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. उपचारानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांना आराम मिळाला आणि तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आईला चालणे, जिने चढणे यासारख्या साध्या गोष्टींसाठीही खूप त्रास होत होता. ओपन हार्ट सर्जरीला धोका असल्याचे समजल्याने आम्ही घाबरलो होतो. मात्र मेडिकव्हर हॉस्पिटलमधील यशस्वी उपचारानंतर आता आईला मोकळा श्वास घेता येत आहे आणि दिवसेंदिवस तिच्या प्रकृती सुधारणा दिसून येत आहे.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा होईल सांगाडा! शरीरात ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास आहारात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख संदीप जोशी म्हणाले, अत्यंत गुंतागुंतीच्या आणि दुर्मिळ हृदय उपचार यशस्वीपणे हाताळणे हे आमच्या प्रगत कार्डिओलॉजी सेवेचा मुख्य उद्देश आहे. विविध तज्ज्ञांचा समन्वय साधत योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञांचे कौशल्यामुळे गंभीर आजाराने पिडीत रुग्णांना नवे आयुष्य मिळते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुर्मिळ हृदयरोग म्हणजे काय?

    Ans: दुर्मिळ हृदयरोग म्हणजे हृदयाशी संबंधित अशा समस्या ज्या तुलनेने कमी लोकांमध्ये आढळतात. यामध्ये हृदयाच्या झडपा, रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या कार्याशी संबंधित समस्या असू शकतात.

  • Que: ओपन हार्ट सर्जरी टाळता येऊ शकते का?

    Ans: काही रुग्णांमध्ये आधुनिक उपचार पद्धती, कॅथेटर-आधारित प्रक्रिया किंवा इतर तंत्रज्ञानामुळे ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय टाळता येऊ शकतो. मात्र निर्णय रुग्णाच्या स्थितीनुसार डॉक्टर घेतात.

  • Que: वय वाढल्यानंतर हृदयाची काळजी कशी घ्यावी?

    Ans: नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रण, संतुलित आहार, व्यायाम आणि ताण कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Rare heart condition treated for the first time in navi mumbai 71 year old woman overcomes serious illness avoiding open heart surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • Heart Disease

संबंधित बातम्या

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती
1

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
2

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
3

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
4

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.