Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स

Side Effects OF Watching Too Much Reels: अनेकांना दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करण्याची आणि रील्स पाहण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 07:31 PM
Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स
Follow Us
Follow Us:
  • दिवसभर रील्स पाहण्याची सवय?
  • आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
  • जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स
आजच्या काळात स्मार्टफोन हा दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनशिवाय आपण कोणत्याही कामाची कल्पनाच करु शकत नाही. काम, शिक्षण, मनोरंजन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहार यांसाठी मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सतत अनेक तास मोबाईल स्क्रीनकडे पाहण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. स्क्रीन टाइम वाढल्याने केवळ डोळ्यांवरच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. काहींना तर तासनतास रील्स पाहण्याची सवय असते. या सवयीमुळे आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात, जाणून घ्या.

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

डोळ्यांवर होतो सर्वाधिक परिणाम

दीर्घकाळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ, खाज आणि धूसर दिसण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांवर ताण निर्माण करतो. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्याने दृष्टी तात्पुरती अंधुक होऊ शकते. तसेच, यामुळे डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे थकवा येतो.

झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याची सवय अनेकांना असते. मात्र स्क्रीनमधून निघणारा ब्लू लाईट मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. त्यामुळे झोप उशिरा येणे किंवा झोपेची गुणवत्ता कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

मान आणि पाठीच्या वेदना वाढू शकतात

मोबाईलकडे सतत खाली मान झुकवून पाहिल्याने मानेवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे मानदुखी, खांदेदुखी आणि पाठदुखीच्या समस्या वाढू शकतात. दीर्घकाळ चुकीच्या स्थितीत बसल्याने शरीराची ठेवणही बिघडू शकते.

मानसिक आरोग्यावरही परिणाम

मोबाईलचा अतिरेक वापर केल्यास तणाव, चिंता, चिडचिड आणि एकाग्रता कमी होण्याच्या समस्या दिसू शकतात. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यामुळे मानसिक थकवा वाढण्याची शक्यता असते.

दिवसातून किती वेळ मोबाईल वापरावा?

तज्ज्ञांच्या मते, काम किंवा शिक्षणासाठी आवश्यक वापर वगळता मनोरंजनासाठी स्क्रीन टाइम शक्यतो मर्यादित ठेवावा. दर काही वेळाने स्क्रीनपासून ब्रेक घेणे, २०-२०-२० नियम पाळणे आणि झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईलचा वापर बंद करणे फायदेशीर ठरते.

  • मुलांनी १ ते २ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन पाहू नये.
  • तरुणांसाठी मनोरंजनासाठी २ ते ३ तासांचा मर्यादित स्क्रीन वेळ सर्वोत्तम असतो.
  • प्रौढ व्यक्तीनी कामाव्यतिरिक्त, सलग ३-४ तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन पाहू नये.
Men’s Health: चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांसाठी धोक्याची घंटा! ‘या’ गंभीर आजाराचा वाढतो धोका; अशी घ्या काळजी

Web Title: Reels mobile addiction health effects screen time side effects tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • mobile
  • Social Media

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
2

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.