आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सोप्या टिप्स
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर प्रामुख्याने पोट, आतड्या आणि हाडांसंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्या उद्भवल्यानंतर शरीराचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. सतत बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाल्यामुळे पोटात गॅस, अपचन, आणि पोट फुगणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जीवन जगले पाहिजे. पण पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी जीवनशैलीतील छोटे मोठे बदल फार उपयोगी पडतील. या बदलांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि आतड्यांमधील वेदना दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: बॅड कोलेस्ट्रॉल हटवण्यासाठी उपयुक्त ठरते ही भाजी
रात्रभर पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे पोटातील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच या पाण्याचे सेवन केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. गॅस किंवा अपचन होऊ नये म्हणून कोमट पाण्यात लिंबू पिळून खावा.
सकाळच्या नाश्त्यामध्ये फायबर असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. जेणेकरून पोटही भरलेले राहील आणि दिवसभर शरीरात उत्साह कायम टिकून राहील. नाश्त्यामध्ये ओट्स, फळे, सुकामेवा किंवा इतर धान्यांचा समावेश करावा. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी योगासने आणि प्राणायाम खूप प्रभावी आहेत. नियमित योगासने केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित पवनमुक्तासन,वज्रासन, कपालभाती प्राणायाम करावे. यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तसेच पचनसंस्था सुधारते.
हे देखील वाचा: दोन आजार, ज्यामुळे अवयवाचे नुकसान होऊ शकते, माहीत असायलाच हवे
अनेक लोक चुकीचा आहार फॉलो करतात. सकाळच्या वेळी हलके अन्नपदार्थ खातात ज्यामुळे सतत भूक लागते आणि रात्रीच्या जेवणात पचनास जड असलेले अन्नपदार्थ खातात, ज्यामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कमीत कमी अन्न खावे. रात्री झोपण्याच्या दोन तास आधी जेवण जेवणे आवश्यक आहे.