कोणते दोन आजार आहेत जे अवयव डॅमेज करतात
पेरिफेरल व्हॅस्कुलर डिसीज (पीव्हीडी) आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी (पीएन) हे दोन आजार आहेत, ज्यांचे सामान्य जागरूकतेच्या अभावामुळे निदानाचे प्रमाण कमी आहे. पीव्हीडी व पीएन हे सामान्य आजार आहेत, ज्यांची लक्षणे समान आहेत आणि या आजारांवर उपचार न केल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, कदाचित अवयव विच्छेदन व स्ट्रोक्सचा त्रास होऊ शकतो. पीव्हीडीमुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात, ज्यामुळे पायामध्ये व शरीरामध्ये रक्तपुरवठा खंडित होतो.
मधुमेह व इतर आजारांच्या गुंतागूंतींमुळे मेंदू व पाठीचा कणा (पेरिफेरल नर्व्ह) बाहेरील नसांचे नुकसान झाल्यास पीएन आजार होतो. फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील डायबेटिक फूट अँड अँकल सर्जन डॉ. राजीव सिंग यांनी अधिक माहिती दिली आहे.
PVD म्हणजे नक्की काय?
पीव्हीडी हा रक्ताभिसरणाशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये ब्लॉकेजेस्, आकडी येणे आणि रक्तवाहिन्या अरूंद होणे अशी लक्षणे आढळून येतात. पीएन आजारामध्ये शरीर सुन्न पडणे, हातापायांना मुंग्या येणे आणि अंगावर शहारे येणे अशी लक्षणे आढळून येतात. मधुमेह व लठ्ठपणा यांसारखे को-मोर्बिडीटीज असल्यास पीव्हीडी आणि पीएनमुळे गंभीर आरोग्यसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
हेदेखील वाचा – शारीरिक संबंधादरम्यानही पुरुषांमध्ये राहील Stamina, देशी पदार्थांचा करा आहारात समावेश
काय आहे अनुभव
पेरिफेरल व्हॅस्कुलर डिसीज (पीव्हीडी) आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी (पीएन) हे दोन आजार
पीएन आणि पीव्हीडीमुळे डायबेटिस मेलिटस असलेल्या रूग्णांमध्ये विच्छेदनाचा धोका वाढतो. नुकतेच आम्ही अशाच प्रकारच्या या केसची हाताळणी केली, ज्यामध्ये मॉरिशसमधील ५६ वर्षीय गॅरेज मेकॅनिक अहमदला (नाव बदललेले) त्याच्या उजव्या पायासाठी विच्छेदन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. तो पेरिफेरल व्हॅस्कुलर डिसीज (पीव्हीडी) आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी (पीएन) आजरांनी त्रस्त होता, तसेच त्याला गेल्या पाच वर्षांपासून मधुमेह देखील होते. मॉरिशसमधील डॉक्टरांनी त्याला अवयव विच्छेदनाचा सल्ला दिला होता. पण, टीमने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे तो विच्छेदन होण्यापासून वाचला.
अहमदने शेअर केला अनुभव
रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे अहमदला आधीच उजव्या पायाची तीन बोटे गमवावी लागली होती आणि त्याला आपला पाय गमवावा लागेल असे सांगितल्यावर आपल्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाटू लागली, कारण तो एकमेव कमावता होता. त्याला त्याच्या उपजीविकेवर परिणाम होणार नाही असा सर्वोत्तम पर्याय पाहिजे होता, म्हणून तो उपचारासंदर्भात दुसऱ्या मतासाठी भारतात आला.
अहमदची तपासणी केल्यावर आमच्या निदर्शनास आले की त्याच्या कापलेल्या बोटांच्या शस्त्रक्रियेच्या जखमेवर गंभीरपणे संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्याला खूप वेदना होत होत्या. आम्ही पेरिफेरल अँजिओग्राफी केली आणि त्यानंतर पेरिफेरल लिम्ब अँजिओप्लास्टी केली, संक्रमित जखमेचा भाग काढून टाकला आणि प्रगत स्किन ग्रॅफ्टिंग तंत्रे वापरली, ज्यात नवीन त्वचा बसवणे आणि जखमेच्या वेदना कमी करणा-या थेरपीचा समावेश होता. या उपचारामुळे अहमदची जखम चार आठवड्यांत बरी झाली. आम्ही अनेकदा संक्रमित जखमा असलेल्या रुग्णांसाठी अशा उपचार पर्यायांची शिफारस करतो.
हेदेखील वाचा – Introvert आहात? एकटं राहणं आवडत असेल तर व्हा सावध! 30 टक्के वाढेल Dementia चा धोका
रक्तवाहिन्या ब्लॉक
तसेच, रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यास आम्ही रक्ताभिसरण पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे पाय किंवा शरीराचा इतर कोणताही अवयव वाचवता येईल. अहमदच्या बाबतीत अशाच प्रकारची प्रक्रिया करण्यात आली. त्याच्या उजव्या मांडीमधील रक्तवाहिनी ब्लॉक झाली होती, ज्यामुळे आम्ही रक्ताभिसरण पूर्ववत करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली, परिणामत: अवयव विच्छेदन करण्याची गरज भासली नाही. अहमदची प्रकृती सध्या बरी असून त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.
अवयव विच्छेदन कधी करतात
व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे अवयव विच्छेदन हा शेवटचा पर्याय असतो, पण कार्यक्षम अवयव गमावल्याने शारीरिक विकलांगत्व येऊ शकते, मानसिक त्रास होऊ शकतो आणि आर्थिक खर्च देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
अहमदाला अशाप्रकारची स्थिती येण्यापासून वाचविण्यात आले. यामधून लक्षात ठेवण्यासारखे आहे की पीव्हीडी आणि पीएन या दोन्ही आजारांच्या व्यवस्थापनासाठी संतुलित आहार आणि जीवनशैली व्यवस्थापन आवश्यक आहे. या दोन्हींपैकी एका आजारासह निदान झाल्यास व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांसोबत योग्य फॉलो-अप घेतला पाहिजे, तसेच आजार अधिक गंभीर होणार नाही याची खात्री घेतली पाहिजे असे मत डॉक्टरांनी मांडले.