चमकदार आणि डाग विरहित चेहऱ्यासाठी दूध लावणे योग्य की अयोग्य?
सर्वच महिलांना डाग विरहित आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी चेहऱ्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर कधी फेशिअल करून घेतले जाते. याशिवाय काही महिला स्किन केअर किंवा महागड्या क्रीम लावून त्वचेची काळजी घेतात. मात्र नेहमी नेहमी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येऊ लागतात. बाजारातील महागड्या ट्रीटमेंट करून न घेता घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती पदार्थ त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. दूध आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि लॅक्टिक अॅसिड संपूर्ण शरीरसाठी गुणकारी ठरते.(फोटो सौजन्य – istock)
दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड, जीवनसत्त्व ‘ए’ तसेच ‘डी’ आणि ‘ई’ इत्यादी अनेक घटक त्वचेसाठी आवश्यक आहे. याशिवाय यामध्ये प्रथिने, फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे त्वचा आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित तुम्ही एक ग्लास दुधाचे सेवन करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दुधाचा वापर करावा की नाही? कोणी चेहऱ्यावर दूध लावावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दुधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा एक्सफोलिएंट करण्यासाठी मदत करते. तसेच वाढत्या उन्हामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी दुधाचा वापर करावा. दुधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे डेड स्किन कमी होते. यामुळे उजळदार आणि मृतत्वचा निघून जाईल. दुधामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि फॅटी अॅसिड्स चेहरा कायम हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी दुधाचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील लवचिकता कायम टिकून राहते.
दुधाचा वापर तुम्ही त्वचेवर थेट सुद्धा करू शकता. वाटीमध्ये दुधाची साई घेऊन हाताने मिक्स करा. त्यानंतर बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर दुधाची साई लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट होईल. त्वचेवरील डेड स्किन कमी करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं दुधाची साई त्वचेवर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास त्वचा अधिक स्वच्छ आणि सुंदर होईल.