Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

क्षयरोगासारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीरात असंख्य बदल दिसून येतात. हा आजार केवळ फुफ्फुसांवरच नाहीतर मणका, किडनी आणि मूत्रपिंडावर परिणाम करतो. जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 03:42 PM
भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण

भारतात क्षयरोगाचे वाढते संकट! प्रतिबंधासाठी साधे उपाय करून मिळवता येईल नियंत्रण

Follow Us
Follow Us:

क्षयरोग (टीबी) हा अजूनही भारतातील मोठा संसर्गजन्य आजार असून त्याचा लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. योग्य वेळी तपासणी, पूर्ण उपचार आणि साधे प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा आजार नियंत्रणात आणता येऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आढळतात. २०२० मध्ये जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २७ टक्के रुग्ण भारतात आढळले आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने प्रभावित होत असल्याने हा सार्वजनिक आरोग्याचा एक गंभीर प्रश्न ठरत आहे. डॉ. शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

कुटुंबाच्या चिंतेने उडाली भारतीय महिलांची झोप! देशातील पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ९% जास्त झोप न येण्याचे प्रमाण

क्षयरोग हा जिवाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो प्रामुख्याने आपल्या फुफ्फुसांवर परिणाम करतो. मात्र काही वेळा तो मेंदू, मणका, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांवरही परिणाम करू शकतो. संक्रमित व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना हा आजार हवेतून पसरतो. योग्य उपचार न घेतल्यास तो जीवघेणा ठरू शकतो, पण वेळेत उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. गंभीर संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर दिसून येतो. यामुळे फुफ्फुस निकामी होण्याची जास्त शक्यता असते. तसेच क्षयरोगाची लागण झाल्यानंतर मेंदू, मणका किंवा मूत्रपिंडासारख्या शरीराच्या इतर भागांवरही परिणाम दिसून येतो.

टीबी झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

  • २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला येणे.
  • खोकल्यातून रक्त पडणे
  • छातीमध्ये वेदना होणे
  • संध्याकाळच्या वेळी ताप येणे
  • भूक न लागणे आणि वजन झपाट्याने कमी होणे.

नागरिकांनी या गोष्टींचे व्यवस्थित पालन करावे:

लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करा:

सतत खोकला, ताप, वजन कमी होणे, थकवा अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.

औषधे मध्येच बंद करू नका:

टीबी झाल्यास अनेक महिने औषधे घ्यावी लागतात. पूर्ण कोर्स न घेतल्यास औषधांना न जुमानणारा टीबी होऊ शकतो.

खोकताना तोंड झाका:

खोकताना किंवा शिंकताना रुमाल, टिश्यू किंवा कोपर वापरा. घरात हवा खेळती राहिल याची काळजी घा व आपल्या घरांत तसेच आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा.

पोषण आणि झोप महत्त्वाची:

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे? जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

मास्क वापरणे गरजेचे:

टीबी हवेतून पसरत असल्यामुळे संक्रमित व्यक्तीने मास्क वापरल्यास संसर्ग रोखता येतो. भारताला क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. वेळीच उपचार, स्वच्छता आणि जागरूकता यामुळे क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: क्षयरोग कशामुळे होतो?

    Ans: मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूंमुळे होतो. हे जंतू हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात.

  • Que: क्षयरोगाची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: १५ दिवसांपेक्षा जास्त काळ सतत खोकला. खोकल्यातून रक्त किंवा कफ पडणे.

  • Que: टीबी कसा पसरतो?

    Ans: जेव्हा सक्रिय क्षयरोगाचा रुग्ण खोकतो, शिंकतो किंवा थुंकतो, तेव्हा हवेत पसरलेले जंतू श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर संसर्ग होतो.

Web Title: Rising tuberculosis crisis in india simple preventive measures to control it expert advice explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • Lung health

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.