Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

आजकाल ओव्हेरियन सिस्ट आणि एंडोमेट्रिओसिससारख्या सौम्य स्त्रीरोगांचे प्रमाण वाढत असल्याने सुरुवातीच्या कॅन्सर आणि सामान्य विकारांमध्ये फरक करणे अधिक कठीण बनले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 02:00 PM
५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

Follow Us
Follow Us:

ओव्हेरियन कॅन्सर हा महिलांमध्ये लवकर निदान करणे सर्वाधिक कठीण असलेल्या कॅन्सरपैकी एक मानला जातो, विशेषतः ५० वर्षांखालील महिलांमध्ये. यामागचे मुख्य कारण म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे अतिशय सौम्य, अस्पष्ट आणि सहज दुर्लक्षित होणारी असतात.सुरुवातीच्या टप्प्यात ओव्हेरियन कॅन्सरमध्ये पोट फुगणे, सौम्य पोटदुखी, थोडे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे, तसेच शौचाच्या सवयींमध्ये किरकोळ बदल अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे अनेक महिलांना नेहमीच जाणवत असल्याने ती आहार, ताणतणाव किंवा तात्पुरत्या पचनाच्या समस्यांमुळे होत असावीत असे समजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक वेळा आजार पुढील टप्प्यात गेल्यानंतरच तो लक्षात येतो.(फोटो सौजन्य – istock)

ट्यूमर मॅपिंग ठरू शकणार गेमचेंजर! रचनेचा सखोल अभ्यास उपचार निवड अधिक अचूक करणार

तरुण महिलांमध्ये निदान उशिरा होण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे या वयोगटात ओव्हेरियन सिस्ट, पीसीओएस (PCOS) आणि पचनासंबंधी विकार अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे ही हार्मोनल किंवा साध्या समस्यांमुळे असावीत असे गृहित धरले जाते. यामुळे ओव्हेरियन कॅन्सरची लक्षणे इतर सामान्य आजारांमध्ये झाकली जातात आणि निदानास विलंब होतो.

याशिवाय, ओव्हेरियन कॅन्सरसाठी आजही प्रभावी आणि खात्रीशीर स्क्रीनिंग टेस्ट उपलब्ध नाही. CA-125 हा ट्यूमर मार्कर तपासणीसाठी वापरला जातो, मात्र तो विशिष्ट नसल्याने एंडोमेट्रिओसिस किंवा साध्या ओव्हेरियन सिस्टमध्येही त्याची पातळी वाढू शकते. अल्ट्रासाऊंड तपासणीदेखील सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट निदान देण्यात अनेकदा अपुरी ठरते.

आजकाल ओव्हेरियन सिस्ट आणि एंडोमेट्रिओसिससारख्या सौम्य स्त्रीरोगांचे प्रमाण वाढत असल्याने सुरुवातीच्या कॅन्सर आणि सामान्य विकारांमध्ये फरक करणे अधिक कठीण बनले आहे. त्यामुळे पुढील तपासण्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता वाढते.

भीती आणि मानसिक ताण हेही निदान उशिरा होण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अनेक महिला लक्षणांकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा तपासणी करण्यास घाबरतात. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो आणि आजार प्रगत अवस्थेत आढळतो.याच कारणांमुळे जवळपास ८० टक्के ओव्हेरियन कॅन्सरची प्रकरणे तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात निदान होतात. सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार बहुतेक वेळा इतर कारणांसाठी केलेल्या तपासण्यांदरम्यान योगायोगाने आढळून येतो. डॉ. तस्नीम भरमल, सैफी रुग्णालयातील कन्सल्टंट मेडिकल आणि हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट यांनी याबाबत माहिती दिली.

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

पुढे काय आवश्यक?

या पार्श्वभूमीवर जनजागृती अत्यंत महत्त्वाची ठरते. महिलांनी शरीरातील सतत जाणवणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये, विशेषतः एखादे लक्षण काही आठवडे कायम राहिल्यास किंवा नेहमीपेक्षा वेगळे वाटल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. प्रभावी स्क्रीनिंग चाचण्या उपलब्ध नसल्याने वेळेवर तपासणी आणि डॉक्टरांकडून अधिक सतर्कतेने केलेले मूल्यांकन हेच लवकर निदान आणि चांगल्या उपचारांसाठी आवश्यक ठरते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे काय?

    Ans: ओव्हरी म्हणजे अंडाशयामध्ये निर्माण होणारा कॅन्सर ओव्हेरियन कॅन्सर म्हणून ओळखला जातो. महिलांमध्ये हा गंभीर आजार मानला जातो.

  • Que: ५० वर्षांखालील महिलांमध्ये हा कॅन्सर ओळखणे कठीण का असते?

    Ans: सुरुवातीची लक्षणे सामान्य पोटदुखी, सूज किंवा पचनाच्या त्रासासारखी दिसतात. त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते.

  • Que: ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

    Ans: पोट फुगणे, सतत पोटदुखी, भूक कमी लागणे, लघवी वारंवार होणे आणि थकवा ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.

Web Title: Why is ovarian cancer difficult to detect in women under 50 know the causes of delayed diagnosis of critical illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Cancer Awareness
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
2

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.