Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची ‘गुलाब रसमलाई’

Rose Rasmalai Recipe: अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मानुसार एक पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. आता चांगला दिवस आणि घरी गोड पदार्थ नाही असं कसं चालेल. चांगल्या दिवसाचा गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही घरी बनवू शकता गुलाब रसमलाई.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 09:45 AM
Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची 'गुलाब रसमलाई'

Recipe : अक्षयतृतीयानिमित्त घरी बनवा रसाळ, चविष्ट आणि गोड चवीची 'गुलाब रसमलाई'

Follow Us
Follow Us:
  • आज अक्षय तृतीयेचा खास दिवस आहे.
  • दिवसाचा गोडवा गोड पदार्थाने वाढवता येतो.
  • तुम्ही घरी गुलाब रसमलाई तयार करु शकता.
अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरू केल्यास ते अखंड वाढत राहते, अशी श्रद्धा आहे. सोने खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा धार्मिक विधी यांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. याचबरोबर घराघरांत गोड पदार्थ बनवण्याचीही परंपरा आहे. कारण गोड पदार्थ म्हणजे आनंद, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक.

टेस्टी आहे पण हेल्दी आहे… चाॅकलेट सोडा, काही मिनिटांतच घरी बनवा ‘डेट्स बार’

अक्षय तृतीया निमित्ताने काहीतरी खास आणि वेगळं बनवायचं असेल, तर पारंपरिक रसमलाईला गुलाबाचा नाजूक सुगंध देऊन तयार केलेली “गुलाब रसमलाई” हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. गुलाबाचा हलका फ्लेवर, मऊ रसगुल्ले आणि केशरी, क्रीमी दूध यामुळे हा पदार्थ केवळ चवीला नाही तर दिसायलाही आकर्षक असतो. पाहुण्यांना किंवा कुटुंबीयांना खास प्रसंगी खुश करण्यासाठी ही रेसिपी नक्कीच उपयोगी पडेल.

साहित्य

  • १ लिटर दूध
  • २ टेबलस्पून लिंबाचा रस
  • १ कप साखर
  • ४ कप पाणी
  • १/२ लिटर फुल क्रीम दूध (रबडीसाठी)
  • ४-५ टेबलस्पून साखर (रबडीसाठी)
  • १ टीस्पून गुलाबजल
  • काही थेंब गुलाब सिरप (रंग आणि चवेसाठी)
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • पिस्ता आणि बदाम काप
थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात १ लिटर दूध गरम करा. उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्या.
  • फाटलेलं दूध स्वच्छ कापडात गाळून घ्या आणि थंड पाण्याने धुऊन आंबटपणा काढून टाका. नंतर घट्ट पिळून ३० मिनिटं टांगून ठेवा.
  • तयार झालेल्या छेनाला हाताने मऊसर मळा. त्याचे छोटे गोळे करून थोडे चपटे करा.
  • एका पातेल्यात पाणी आणि साखर उकळवा. त्यात हे गोळे घालून १०-१२ मिनिटं शिजवा.
  • दुसऱ्या भांड्यात १/२ लिटर दूध आटवून घट्ट करा. त्यात साखर, वेलदोडा पूड, गुलाबजल आणि गुलाब सिरप घाला.
  • शिजलेले गोळे हलकेच दाबून त्यातील पाणी काढा आणि तयार रबडीत घाला.
  • वरून पिस्ता-बदाम काप घालून २-३ तास थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
  • थंडगार गुलाब रसमलाई अक्षय तृतीया सारख्या शुभ दिवशी प्रसाद म्हणून किंवा जेवणानंतर डेसर्ट म्हणून सर्व्ह करा.
  • ही खास रेसिपी तुमच्या सणाला अधिक गोड आणि संस्मरणीय बनवेल.

Web Title: Rose rasmalai recipe in marathi akshaya tritiya special sweet dish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
1

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
2

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.