Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ

मुलांच्या पाठीवर हल्ली इतकं मोठं दप्तराचं ओझं असतं की आई-वडिलांनाही त्यांची दया येते. पण यामुळे आता लहान वयातच मुलांना मणक्याच्या समस्या जाणवू लागल्या असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2026 | 03:57 PM
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचा अतिरिक्त भार होणार आता कमी; शिक्षण विभागाकडून कडक सूचना जारी

Follow Us
Follow Us:
  • शाळेतील मुलांच्या खांद्यावरील ओझे 
  • लहान वयात होतोय मणक्याच्या समस्यांचा त्रास 
  • तज्ज्ञांनी दिला इशारा 
शाळा सुरू झाल्यानंतर मुलांच्या खांद्यावर पुन्हा एकदा पुस्तकं, वह्या, डबा, पाण्याची बाटली आणि इतर आवश्यक साहित्याने भरलेली दप्तरं दिसू लागतात. शालेय जीवनाचा हा अविभाज्य भाग असला, तरी दररोज गरजेपेक्षा जास्त वजनाचे दप्तर वाहून नेल्याने मुलांच्या विकसित होत असलेल्या मणक्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी दप्तराचे वजन आणि ते वापरण्याची योग्य पद्धत याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

लहान मुलांची हाडे, स्नायू आणि सांधे अजूनही वाढीच्या टप्प्यात असतात. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण आल्यास दुखापत होण्याचा धोका अधिक असतो. जड दप्तरामुळे शरीराचा तोल सांभाळण्यासाठी मुलांना पुढे झुकावे लागते. यामुळे मान, खांदे आणि कमरेवर अतिरिक्त ताण पडतो. हा ताण दीर्घकाळ राहिल्यास स्नायू दुखणे, चुकीची शरीरस्थिती (पोश्चर), पाठदुखी आणि काही प्रकरणांमध्ये मणक्याशी संबंधित दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. अशा समस्यांचा मुलांच्या दैनंदिन हालचालींवर आणि शारीरिक विकासावर परिणाम होऊ शकतो. डॉ. सुशांत श्रीवास्तव, बाल अस्थिरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

काय आहेत समस्या, जाणून घ्या लक्षणे 

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना वारंवार पाठ, मान किंवा खांदे दुखणे, दप्तराच्या पट्ट्यांमुळे खांद्यांवर लाल व्रण पडणे, सरळ उभे राहण्यास त्रास होणे, शरीराची ठेवण बिघडणे किंवा दप्तर खूप जड असल्याची तक्रार करणे ही धोक्याची लक्षणे मानली पाहिजेत. काही मुलांमध्ये लवकर थकवा येणे, डोकेदुखी, तसेच दप्तराच्या पट्ट्यांच्या सततच्या दाबामुळे खांद्यामध्ये मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

किती असावं दप्तराचं वजन 

तज्ज्ञांच्या मते, शालेय दप्तराचे वजन मुलाच्या एकूण शरीराच्या वजनाच्या १० ते १५ टक्क्यांपेक्षा अधिक नसावे. दप्तर निवडताना ते शक्यतो हलके, रुंद व मऊ गादी असलेल्या (पॅडेड) खांद्याच्या पट्ट्यांसह आणि पाठीला योग्य आधार देणारे असावे. मुलांनी दप्तर नेहमी दोन्ही खांद्यांवर समप्रमाणात घालावे. एका खांद्यावर दप्तर अडकवून नेण्याची सवय टाळावी. तसेच त्या दिवशी आवश्यक असलेली पुस्तके-वह्याच दप्तरात ठेवावीत आणि शाळेत लॉकरची सुविधा असल्यास त्याचा वापर करावा.

याशिवाय नियमित स्ट्रेचिंग आणि वयानुसार योग्य व्यायाम केल्याने पाठ व पोटाच्या (कोअर) स्नायूंना बळकटी मिळते. त्यामुळे शरीराची योग्य ठेवण राखण्यास आणि मणक्याचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते. दप्तराचे वजन कमी करूनही मुलाला सतत पाठदुखी, हात-पायाला मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा चालताना अडचण येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी त्वरित बाल अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शालेय दप्तराचा योग्य वापर आणि काही सोप्या सवयी अंगीकारल्यास जड दप्तरामुळे होणाऱ्या मणक्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येतात. यामुळे मुलांचे मणक्याचे आरोग्य चांगले राहते आणि ते संपूर्ण शैक्षणिक वर्षात निरोगी, सक्रिय व उत्साही राहू शकतात.

महापालिकेतील सर्व विभागांची दप्तर तपासणी होणार – आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आदेश

Web Title: School children stooped under the weight of schoolbags spinal issues arriving what the experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Child Health
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
2

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
3

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
4

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.