मुलांमध्ये कोणत्या आजाराची होतेय वाढ (फोटो सौजन्य - iStock)
जगभरात लठ्ठपणाची समस्या वाढत आहे आणि पुढील २५ वर्षांत त्याचे प्रमाण प्रचंड वाढण्याची अपेक्षा आहे. संशोधकांच्या मते, २०५० पर्यंत जगातील एक तृतीयांश मुले आणि किशोरवयीन मुले लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असतील.
हा अभ्यास ऑस्ट्रेलियातील मर्डोक चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूटने केला आहे आणि त्याचे निकाल चिंताजनक आहेत. या वाढत्या समस्येचा आरोग्यावर होणारा परिणाम केवळ आर्थिकदृष्ट्याच मोठा नसेल तर मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होईल.
भविष्यात होणारा लठ्ठपणाचा परिणाम
या आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. जेसिका केर म्हणाल्या, “या वाढत्या समस्येमुळे आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर अब्जावधी डॉलर्सचा भार पडेल. यासोबतच, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, श्वास घेण्यास त्रास, प्रजनन समस्या आणि मानसिक आरोग्य समस्या यासारख्या उच्च बॉडी मास इंडेक्स (BMI) शी संबंधित समस्या आज आणि भविष्यात मुले आणि किशोरवयीन मुलांवर परिणाम करतील.”
या संशोधनातून असे दिसून आले आहे की १९९० ते २०२१ पर्यंत ५ ते २४ वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट वाढले आहे. २०२१ मध्ये, जगभरात ४९.३ कोटी मुले आणि किशोरवयीन मुले लठ्ठ किंवा जास्त वजनाची होती.
लठ्ठपणा आणि आजारांवरील रामबाण उपाय लो कॅलरी फूड्स, 5 पदार्थांचा करा डाएटमध्ये समावेश
कोणते आजार होऊ शकतात
लठ्ठ मुलांना स्ट्रोक, अनेक प्रकारचे कर्करोग, हृदयरोग, टाइप २ मधुमेह, अकाली मृत्यू आणि नंतरच्या आयुष्यात मानसिक आजार होण्याचा धोका वाढतो. वयापेक्षा अधिक जाडपणा अथवा लठ्ठपणा हा मुलांमध्ये आळस निर्माण करतो आणि त्यामुळे लहान वयातच त्यांना अनेक आजार जडतात आणि त्यावर उपाय करणेही कठीण ठरते. लठ्ठपणा कमी करणे हाच एक मोठा टास्क सध्या सर्वांसमोर उभा ठाकला आहे. बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे नक्कीच मुलांमधील लठ्ठपणाचा आजार वाढत चाललेला दिसून येत आहे आणि त्याची कारणंही स्पष्ट आहेत.
वेळीच पावलं उचलणे आवश्यक
डॉ. केर म्हणाले की, जर या समस्येवर त्वरीत पावलं उचलली नाही तर भविष्यात आपल्या मुलांचे जीवन कठीण होऊ शकते. २०३० पूर्वी सक्रिय पावले उचलली तर ही समस्या सोडवता येईल. तज्ज्ञांच्या मते 2050 पर्यंत दर ३ मुलांमधील १ मुलाला लठ्ठपणाची समस्या भेडसावू शकते आणि हे अत्यंत वाईट आहे. असे झाल्यास लठ्ठपणा हा एक महामारी आजार म्हणून पाहिला जाईल आणि त्यावर काहीच उपाय करता येणार नाही.
लठ्ठपणा कमी करण्याचे 4 आयुर्वेदिक उपाय, 1 महिन्यात विरघळेल पोटाची चरबी
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.