Ayurvedic Treatment For Obesity: लठ्ठपणा हा आजच्या काळातील सर्वात मोठा आजार आहे. हा आजार कधीच एकटा येत नाही. या आजारासोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, मानसिक ताण यांसारखे आजारही अगदी चिकटून येतात. मात्र असेल अजिबात नाही की, लठ्ठपणा कमी करता येत नाही. काही असे आयुर्वेदिक उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर लठ्ठपणा कमी करू शकता. 1 महिन्यात लठ्ठपणा कसा कमी करायचा हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी दिलेले हे 4 उपाय नक्की वाचा (फोटो सौजन्य - iStock)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणासह विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार सर्वोत्तम मानले जातात. ही उपचार पद्धती स्वस्त तर आहेच पण तिचा अवलंब केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत
लठ्ठपणा कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी हा उत्तम उपाय मानला जातो. या दोन्हीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते
कढीपत्त्याचा उपाय देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या उपायाचा अवलंब केल्याने केवळ कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात येत नाही तर पोटातील अतिरिक्त चरबीही हळूहळू वितळते. तुमच्या जेवणात किमान 10 कढीपत्त्याचा समावेश करा
ओव्याच्या पाण्याचा उपाय शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो. याचे सेवन केल्याने मोठे झालेले पोट सावरते आणि शरीराची पचनक्रियाही चांगली राहते
एका ग्लासमध्ये 2 चमचे ओवा मिसळा आणि रात्रभर तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून त्यात मध टाकून प्या. दररोज असे केल्याने तुम्हाला फायदा होईल
लिंबाचा रस शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. त्याचा आंबट रस प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अतिरिक्त ॲसिडिटीही दूर होते
अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा मध आणि 3 चमचे लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात मिसळून चांगले मिसळा. यानंतर, दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिणे सुरू करा