
जिव्हाळायाचे ऋणानुबंध....! तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला आणि मित्रमैत्रणींना द्या शुभ सकाळच्या खास शुभेच्छा
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहात झाल्यास संपूर्ण दिवस छान जातो. काहींना सकाळी उठल्यानंतर सुंदर भक्तीगीत ऐकायला आवडतात तर काहींना सकाळी उठल्यानंतर जिम किंवा वर्कआऊट करण्याची खूप जास्त सवय असते. दिवसाची होणारी प्रत्येक नवीन सकाळ सकारात्मक सुरुवात असते. त्यामुळे उठल्यानंतर कायमच चांगले विचार करणे फार आवश्यक आहे. दिवसाच्या सुरुवातीला आपण मनात काय ठरवतो, यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. त्यामुळे सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करणे फार आवश्यक आहे. आपल्याप्रमाणे इतरांच्या दिवसाची सुरुवात चांगली आणि आनंदाने होण्यासाठी हे मराठमोळे सुविचार नातेवाईक किंवा मित्रमैत्रीणीना नक्कीच पाठवा. समोरच्या व्यक्तीला सुप्रभातच्या शुभेच्छा दिल्याने त्यांचा आनंद सुद्धा अधिक वाढण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
समस्या ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते,
जे फक्त ते आपल्या पोत्याकडे बघतात त्यांना ते जड वाटते,
जे ती हाताळतात त्यांना खरे वास्तव वाटते
शुभ सकाळ.
जीवनाच्या प्रत्येक पानावर
सुखाचा इतिहास लिहितो
शुभ सकाळ
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी
शुभ सकाळ
चूक ही आयुष्याचं एक पान आहे
माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे
गरच पडली तर चुकीचं पान फाडून टाका
एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका
शुभ सकाळ
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ
सूर्योदयाची पहिली किरण मनाला देते उर्जा,
आजचा दिवस असो उत्कृष्ट आहे समजा
तुमच्या हातून घडो कर्माचा पूजा,
तुमच्या स्वप्नांना मिळो वेग,
आयुष्यात भरो नवी उमेद
शुभ सकाळ
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात
माणसांची किमत ही कपडे आणि पैशे यावरून न करता
त्याच्यात आसलेल्या माणुसकी आणि सद्गुंणावरून करा
शुभ सकाळ
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले,
शुभ सकाळ
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !
आयुष्यात वाटा बदलल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
गर्व करून नाती तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही,
माणसंच साथ देतात…!
शुभ सकाळ !
दिवा कधीच बोलत नाही, पण त्याचा
प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
तुम्हीही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करा, तेच तुमचा परिचय देतील
शुभ सकाळ
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ खरंच कोरडे होतात का? जाणून घ्या सत्य
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात