संगीत सोहळ्यातील श्लोका अंबानीचा लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
श्लोका मेहता अंबानी नेहमीच सर्वांना जपताना दिसते आणि त्याप्रमाणेच अंबानी घराण्याला शोभेल अशीच तिची कायम क्लासी स्टाईल असते. श्लोकाची बहीण दिया मेहता जटिया तिचे लुक स्टाईल करत असते. नुकताच श्लोकाचा पेस्टल रंगाच्या साडीतील लुक व्हायरल होताना दिसतोय. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला श्लोकाचा लुक कसा होता आपण या लेखातून पाहूया.
श्लोकाची स्टाईल ही नेहमीच वेगळी असते आणि चारचौघात उठून दिसणारी असते. श्लोकाचा संगीत सोहळ्यासाठी लुकदेखील तिच्या बहिणीने स्टाईल केला असून तिने यावेळी कस्टम साडीचा वापर केला होता. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
आयव्हरी प्रिस्टन शेड साडी
Tamara Ralph कस्टम साडी
श्लोका मेहता अंबानीने अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी आयव्हरी पेस्टल शेडमधील साडी नेसली असून तमारा राल्फ कस्टम साडीचा वापर केलाय. या साडीला खाली फ्लोरल डिझाईन देण्यात आले असून एखाद्या राजकुमारीचा फील यावा अशा पद्धतीने याची स्टाईल करण्यात आली आहे.
हॉल्टर नेक ब्लाऊज
ब्लाऊजची एलिगंट स्टाईल
या साडीसह श्लोकाने मोत्यांची गुंफण केलेला बॅकलेस असा हेव्ही एम्बेलिश्ड ब्लाऊज परिधान केलाय. याचे डिझाईन क्लासी असून ब्लाऊजचा मागे बो डिझाईनमध्ये जोडण्यात आले आहे. सिल्व्हर आणि मोती अशी गुंफण घालून याचे डिझाईन करण्यात आले आहे आणि हे अत्यंत सुंदर दिसत आहे.
डायमंडचे दागिने
हिऱ्यांच्या दागिन्याची स्टाईल
या एलिगंट साडीसह श्लोकाने डायमंड कानातले आणि हातामध्ये संपूर्ण डायमंड वर्क केलेले दागिने घालून लुक पूर्ण केलाय. श्लोकाचा हा लुक अत्यंत वेगळा आणि स्टायलिश असून कोणत्याही समारंभासाठी परफेक्ट आहे.
ब्रेडेड हेअरस्टाईल
स्टायलिश वेणी
श्लोकाने या साडीसह चार गुंफण असणारी वेणी घातली असून साडीला मॅचिंग असे त्यामध्ये स्टायलिश दोर बांधले आहेत. यामुळे साडीत कुठेही केस अडकणार नाहीत आणि दिसायलादेखील अत्यंत क्लासी दिसेल. साडीसह कोणती हेअरस्टाईल करायची असा प्रश्न असेल तर श्लोकाची ही हेअरस्टाईल प्रेरणादायी आहे.
न्यूड मेकअप लुक
श्लोकाचा ग्लॉसी ग्लॅम लुक
श्लोकाने या आयव्हरी साडीसह शोभेल असाच न्यूड मेकअप लुक केलाय. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी हा मेकअप केला असून स्मोकी आईज लुक, काजळ, हायलायटर आणि न्यूड ब्राऊन शेड लिपस्टिकचा वापर केला आहे. तसंच ही लिपस्टिक थोडी ग्लॉसी असून दिसायला अधिक आकर्षक दिसत आहे.