Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’लोकांनी चुकूनही करू नका शेंगदाण्याचे सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

आरोग्यसाठी पौष्टिक असलेले शेंगदाणे काहींच्या आरोग्यासाठी मात्र घातक ठरू शकतात. शेंगदाणे खाल्ल्यामुळे पुरळ येणे, सूज येणे, अतिसार, उलट्या होणे, मळमळ होणे, पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवल्यास तर शेंगदाण्याचे सेवन करू नये. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2024 | 10:01 AM
शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

संध्याकाळच्या वेळी हलकीशी भूक लागल्यानंतर किंवा इतर वेळी शेंगदाण्याचे सेवन केले जाते. शेंगदाणे आरोग्यासाठी पौष्टिक असतात. गरिबांचा बदाम म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. पण अनेकदा हेच शेंगदाणे काहींच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येते. त्यामुळे जेवणातील इतर पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाण्याचा वापर केला जातो. अनेकदा संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर शेंगदाणे खाल्ले जातात. पण हेच कच्चे शेंगदाणे खाल्ल्यानंतर अनेकांना त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

‘या’ लोकांनी चुकूनही करू नका शेंगदाण्याचे सेवन:

रक्तदाबाची समस्या:

उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात चुकूनही शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. घरी शेंगदाणे खाल्ल्यानंतर ते मिठात भाजून किंवा मिठाच्या पाण्यात शिजवून खाल्ले जातात. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील रक्त वाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा: युरिक अ‍ॅसिडमुळे त्रस्त आहात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, सांधेदुखी होईल कायमची दूर

ऍलर्जीची समस्या:

काहींना शेंगदाणे खाल्ल्यानंतर ऍलर्जी होते. अशावेळी खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे, अतिसार, उलट्या होणे, मळमळ होणे, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घरघर येणे, छातीत घट्ट होणे, नाक वाहणे, डोळ्यांमधून पाणी येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यास शेंगदाण्याचे सेवन करू नये.

शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

यूरिक ऍसिडची समस्या:

यूरिक ऍसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात शेंगदाणे युक्त पदार्थांचे सेवन करू नका. शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीरात युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. यामुळे सांधेदुखी, हातापायांमध्ये मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. शेंगदाण्याचे सेवन केल्यामुळे संधिवाताचा त्रास आणखीन वाढण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा:या व्यक्तींनी चुकूनही राजमा खाऊ नये.. 

पचनसंबंधित समस्या:

ज्या लोकांनी पचनसंबंधित समस्या आहेत, अशांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्यामुळे अपचन, असिडिटी, पोटात दुखणे इत्यादी इत्यादी अनेक समस्या जाणवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of eating peanuts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • Bad Quality Food
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.