
बाजारातून आणलेली फुल टिकवून ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
बाजारात वर्षाच्या बाराही महिने फुले उपलब्ध असतात. फुले मार्केट किंवा इतर फुलांच्या दुकानात गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुल पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रंगांची सुंदर अनिता आकर्षक दिसणारी फुल पाहिल्यानंतर मनाला सुद्धा आनंद वाटतो. घरी किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी देवाला फुल अर्पण केली जातात. तसेच घरी नित्यनियमाने देवाची मनोभावे पूजा केली जाते. तेव्हा देवघरात झेंडू, गुलाब, जास्वंदी इत्यादी फुल वाहिली जातात. देवघरात फुल असली की देवघर आणखीन सुंदर आणि छान दिसते. रोज रोज बाजारात फुल आणायला जाण्यासाठी वेळ भेटत नाही. अशावेळी आठवड्याभराची फुल आधीच आणून ठेवली जातात.
आठवडाभराची फुल घरी आणून फ्रिजमध्ये किंवा टोपलीमध्ये आणून ठेवली जातात. पण घरी आणलेली फुल जास्त काळ टिकून राहत नाही. एक किंवा दोन दिवसांमध्ये लगेच फुल खराब होऊन कोमेजून जातात. महाग किमतीची फुले विकत आणून लगेच खराब झाल्यानंतर पैसेही व्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरी आणलेली फुल जास्त दिवस ताजी टवटवीत ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही घरी आणलेली फुल ताजी टवटवीत ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: जामुन लाकूड पाण्याची टाकी कशी स्वच्छ ठेवते ते जाणून घ्या
बाजारातून आणलेली फुल टिकवून ठेवण्यासाठी सोप्या टिप्स