Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या वाढीसाठी शाम्पू – तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ही’ पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

केसांच्या वाढीसाठी बाजारातील विकतचे सप्लिमेंट्स आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक चटणीचा आहारात समावेश करावा. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 24, 2026 | 08:31 AM
केसांच्या वाढीसाठी शाम्पू - तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा 'ही' पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

केसांच्या वाढीसाठी शाम्पू - तेल लावून कंटाळा आला? मग पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा 'ही' पौष्टिक चटणी, केस होतील लांबलचक

Follow Us
Follow Us:

केसांचे सौंदर्य कायमच सुंदर ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेले हेअर केअर प्रॉडक्ट तर कधी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण केसांच्या मुळांना आवश्यक पोषक घटक न मिळाल्यामुळे केस कमकुवत होऊन जातात आणि केस गळणे किंवा केस पांढरे होणे इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. वय वाढल्यानंतर सुद्धा काहींचे केस घनदाट, लांबसडक, काळेभोर आणि खूप जास्त सुंदर असतात. केसांच्या समस्या वाढल्यानंतर त्या कमी करण्यासाठी वेगवेगळे महागडे हेअर सीरम, हेअर शाम्पू, कंडिशनर तर काहीवेळा हेअर मास्क लावून केसांची काळजी घेतली जाते. पण केसांच्या मुळांना आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे महागड्या प्रॉडक्टचा केसांवर कोणताच परिणाम दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

गर्मीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम आले आहेत? मग उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर आजीआजोबांपर्यंत सगळ्यांचे केस खूप जास्त गळतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केस गळून केसांमध्ये टक्कल पडू लागतात. अशावेळी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून केसांच्या समस्यांवर उपाय शोधले जातात. पण केसांच्या वाढीसाठी केसांना बाहेरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे खूप जास्त गरजेचे आहे. यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी पारंपरिक पद्धतीमध्ये पौष्टिक चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दैनंदिन आहारात नेहमीच पौष्टिक चटणीचे सेवन केल्यास शरीरसोबतच केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतील.

केसांच्या वाढीसाठी पौष्टिक चटणी बनवण्याची कृती:

चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये नारळाचे तेल गरम करून घ्या. गरम तेलात शेंगदाणे, चणा डाळ, धणे, जिरं, ओल्या खोबऱ्याचा किस, कडीपत्त्याची पाने, काळे तीळ, लाल सुक्या मिरच्या इत्यादी सर्व साहित्य वेगवेगळे खरपूस मंद आचेवर भाजा. भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवा. मिक्सरच्या भांड्यात चिंच, शेवग्याच्या पानाची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून जाडसर चटणी वाटून घ्या. वाटून घेतलेली चटणी काचेच्या हवा बंद डब्यात भरून ठेवा. यामुळे चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहील आणि लवकर खराब होणार नाही.

रफ केसांना म्हणा बाय-बाय! केस धुण्यापूर्वी करा ‘हा’ सोपा उपाय; केस होतील सॉफ्ट, सिल्की आणि चमकदार

तयार केलेली चटणी दिवसभरात २ ते ३ वेळा सेवन केल्यास शरीरसोबतच केसांच्या वाढीवर सुद्धा सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि केस सुंदर होतील. शेवग्याच्या शेंगा केसांसाठी वरदान मानल्या जातात. यामध्ये लोह, विटामिन-ए, सी इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते. कडीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस गळणे थांबते आणि केस मजबूत होतात. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेली चटणी जेवणाची चव वाढण्यासोबतच शरीर आणि केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवून देईल. शेंगदाणे आणि भाजलेल्या चणा डाळीमध्ये नैसर्गिक प्रोटीन आणि बायोटीन युक्त घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात चटणीचा नियमित समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Tired of using shampoo oil for hair growth then make this nutritious chutney in the traditional way the hair will be long

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
4

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.