आयब्रो किंवा फेस रेझर केल्यानंतर त्वचेमध्ये सतत जळजळ होते? मग 'हे' घरगुती उपाय ठरतील प्रभावी
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला पार्लरमधील वेगवेगळ्या ट्रीटमेंट करत असतात.याशिवाय कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. हल्ली शरीरावरील केस काढणे ही अतिशय सामान्य गोष्टी आहे. अंगावर वाढलेले अनावश्यक केस काढण्यासाठी रेझर, थ्रेडींग, वॅक्सिंग इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. याशिवाय बदलत्या काळानुसार त्वचेवरील केस काढण्यासाठी लेझर ट्रीटमेंटसुद्धा केली जात आहे. यामुळे अंगावरील केस नाहीसे होतात. हेअर रिमव्हूवर टेकनिक्सचा वापर करताना काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच त्वचेला सूट होईल अशाच ट्रीटमेंट कराव्यात.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांवर असणारा चष्मा पळवून लावा! ‘हे’ पथ्य करा फॉलो
अंगावर वाढलेले केस काढण्यासाठी महिला अतिशय स्वस्ताला पर्याय वापरतात. पण चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावर थ्रेडींग केल्यामुळे त्वचा काहीवेळा खूप जास्त झोंबते तर काहीवेळा त्वचेमध्ये जळजळ होते. आयब्रो किंवा अप्परलिप्स केल्यानंतर त्वचेवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे काहीवेळा सूज, लाल चट्टे किंवा त्वचा कोरडी पडण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी होईल. याशिवाय थ्रेडींग केल्यामुळे काहीवेळा चेहऱ्यावर जखमा होतात.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची गुणवत्ता कायमच निरोगी ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचा अधिक हायड्रेट ठेवण्यास मदत करते. आयब्रो किंवा थ्रेडींग करून आल्यानंतर त्वचा पाण्याने धुवण्याआधी संपूर्ण चेहऱ्यावर कोरफड जेल लावावे. काहीवेळ कोरफड जेल चेहऱ्यावर लावून तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल.
स्किन केअर प्रॉडक्टबनवताना गुलाब पाण्याचा मोठा वापर केला जातो. गुलाब पाणी त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी मदत करते. गुलाबपाणी केवळ सुगंधीच नाहीतर त्वचेसाठी अतिशय गुणकारी ठरते. थ्रेडींग करून आल्यानंतर गुलाबपाणी संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. यामुळे त्वचेमध्ये थंडावा टिकून राहतो.
नियमित त्वचेवर बर्फ फिरवल्यास सैल झालेली त्वचा टाईट होते. तसेच वॅक्सिंग किंवा थ्रेडींग करून आल्यानंतर हळुवार हाताने संपूर्ण चेहऱ्यावर बर्फ फिरवून घ्यावा. यामुळे त्वचा मुलायम होते.