डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा वयस्कर दिसते? मग 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
हल्ली महिलांसह पुरुषांच्या चेहऱ्यावर सुद्धा डार्क सर्कल्सची समस्या वाढली आहे. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग त्वचा पूर्णपणे निस्तेज करून टाकतात. याशिवाय डोळ्यांना इजा पोहचण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला मानसिक तणाव, अपुरी झोप, सतत मोबाईल किंवा लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढण्याची शक्यता असते. डोळ्यांखाली आलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करून पाहतात. कधी क्रीम लावून डोळे सुंदर केले जातात तर कधी फेशिअल किंवा क्लीनअप करून त्वचेवरील डाग घालवण्याचा प्रयत्न केला जातो. पण तरीसुद्धा डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी होत नाहीत. डोळ्यांखालील काळी झालेली त्वचा पुन्हा उजळदार करण्यासाठी कोणत्याही क्रीम किंवा केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य: Pinterest)
अर्ध्या लिंबूच्या मदतीने साफ करा मानेवरचा काळा थर; फक्त 15 मिनिटांतच दिसून येईल फरक
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दीर्घकाळ सुंदर आणि चमकदार राहण्यासाठी चुकीची जीवनशैली फॉलो न करता निरोगी आणि आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली वाढलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग कमी होऊन त्वचेवर ग्लो येईल, याशिवाय तुमची त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे डोळे अतिशय निस्तेज वाटतात.
डोळ्यांभोवती काळे डाग येण्यामागे अनेक कारण आहेत. झोपेची कमतरता, वाढलेले वय, जेनेटिक्स, एलर्जी, डिहायड्रेशन, जास्तवेळी स्क्रिन पाहणे, उन्हात जास्तवेळ बसून राहणे किंवा चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे डोळ्यांभोवती काळे डाग येतात. हे काळे डाग त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे खूप जास्त गजरेचे आहे.
Homemade Hair Oil: पांढरे केस काळे करण्यासाठी ‘हा’ घरगुती उपाय ठरेल प्रभावी, होतील काळेभोर सुंदर केस
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यासाठी कच्चे दूध, हळद, मध, कॉफी पावडरचा वापर करावा. वाटीमध्ये कच्चे दूध, हळद आणि कॉफी पावडर एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती आणि चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. १५ ते २० मिनिट झाल्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर डोळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवडाभर नियमित हा उपाय केल्यास डोळे अतिशय देखणे होतील.