
गॅस्ट्रिक कर्करोग नक्की काय आहे आणि कशी काळजी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
धूम्रपान करणाऱ्यांना हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, जो पोटाचा अल्सर आणि कर्करोगाशी संबंधित एक जिवाणू संसर्ग आहे. सेकंडहँड स्मोकच्या संपर्कात आल्यानेही धोका वाढतो. म्हणूनच, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि या कर्करोगाला प्रतिबंध करावा. पोटाच्या कर्करोगाची लक्षणे म्हणजे अपचन, पोटफुगी, मळमळ, भूक न लागणे आणि अस्पष्ट वजन कमी होणे. सुरुवातीला ही लक्षणे सौम्य असू शकतात, त्यामुळे बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे निदान आणि उपचारांना विलंब होतो. डॉ. मनोज लोखंडे, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर, सातारा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
गॅस्ट्रिक कॅन्सर कारणे काय आहेत?
पोटाच्या कर्करोगाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत –
महत्त्वाच्या टिप्स ज्याने होऊ शकतो धोका कमी
धूम्रपान आणि सेकंडहँड स्मोकींग टाळा. तज्ज्ञांच्या मदतीने धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी विशेष थेरपीचा वापर करा. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी धूम्रपान टाळणे ही काळाची गरज आहे. फळे, भाज्या आणि तृणधान्यांनी समृद्ध असा संतुलित आहार घ्या. जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.
कौटुंबिक इतिहास किंवा सतत पोटाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. अपचन, उलट्या किंवा अचानक वजन कमी होणे आणि पोटात दुखणे यासारख्या लक्षणांकडे त्वरीत लक्ष द्या. पोटाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर तज्ञ तुमच्यासाठी उपचारांची पद्धत ठरवतील ज्यामध्ये केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी किंवा टार्गेट्ड थेरपीसह शस्त्रक्रियेचा समावेश असू शकतो. पोटाच्या कर्करोग जागरूकता महिन्यातंर्गत निरोगी भविष्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि चांगल्या सवयी लावून घेण्याचा निश्चय करुया.