पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे
धावपळीच्या आयुष्यात चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करून जीवन जगणे गरजेचे आहे. हल्ली कॅन्सरच्या रुग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे विस्खलित होऊन जाते. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लक्षणे योग्य वेळी ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
कॅन्सरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशातच पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पोटाच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे.
पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात नकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे अचानक वजन कमी होते. कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होण्यास सुरुवात झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. याशिवाय पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीराची भूक कमी होऊन जाते. ही लक्षणे कॅन्सरच्या गाठी वाढल्यामुळे दिसून येतात.
ओटीपोट म्हणजे पोटाच्या वरचा भाग. पोटाच्या वरच्या भागात असह्य वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. काहीवेळ ओटीपोटात सतत किंवा अधूनमधून वेदना होऊ लागतात. कोणताही पदार्थ खाल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यावर जास्त वेदना होतात.
कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर वारंवार उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटू लागल्यास पोटातील गाठींमध्ये वाढ झाल्याचे लक्षणं आहे. या गाठी वाढल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. याशिवाय शरीरात जळजळ वाढू लागते. कॅन्सरच्या गाठी मोठ्या झाल्यानंतर उलट्या होण्याचे प्रमाण वाढते.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. त्यामध्ये पोटाच्या कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर आतड्यांमध्ये रक्त येऊन शौचास साफ होत नाही. याशिवाय शौचाचा रंगसुद्धा बदलून जातो. तसेच आतड्यांमधून जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर वेदना होऊ लागतात.