Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

Easy Dhokla Recipe: जर तुम्हालाही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मऊ-स्पॉंजी ढोकळा बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 08:20 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

ढोकळा हा गुजरातमधील लोकप्रिय पदार्थ असला तरी हा पदार्थ अनेकांना आवडतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ढोकळा अनेकांच्या पसंतीस उतरतो. बाजारात मिळणारा मऊ, जाळीदार आणि स्पॉंजी ढोकळा घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात, मात्र काही छोट्या चुकांमुळे तो कडक, चिवट किंवा आतून कच्चा राहतो. योग्य साहित्य, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली तर घरच्या घरीही परफेक्ट ढोकळा सहज तयार करता येतो. जाणून घ्या मऊ-स्पॉंजी ढोकळ्याची सोपी रेसिपी.

ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • २ कप बेसन
  • १ कप दही
  • १ चमचा लिंबाचा रस
  • १ चमचा साखर
  • चवीनुसार मीठ
  • १ ईनोचे पॅकेट
  • अर्धा कप पाणी
  • १ चमचा तेल
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरव्या मिरच्या
  • साखर आणि पाण्याचे मिश्रण

ढोकळा बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात दही, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि पाणी घालून गाठी न राहता मऊसर बॅटर तयार करा. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. यानंतर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. ढोकळ्याचे भांडे तेल लावून तयार ठेवा. आता बॅटरमध्ये ईनो किंवा बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने एकदा मिसळा. लगेच हे मिश्रण भांड्यात ओता आणि स्टीमरमध्ये ठेवा. मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्या. शिजल्यानंतर सुरी किंवा टूथपिक घालून तपासा. परफेक्ट बेक झाल्यास ढोकळा दुसऱ्या ताटात काढून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. यामध्ये साखर आणि अर्धा कप पाणी मिक्स करुन उकळवा आणि तयार ढोकळ्यांवर पसरवा. मऊ-स्पॉंजी ढोकळा पुदीन्याची चटणीसोबत सर्व्ह करा.

ढोकळा बनवताना होणाऱ्या सामान्य चुका

  • बेसनात गाठी राहिल्यास ढोकळा जाळीदार होत नाही आणि आतून कच्चा राहू शकतो.
  • योग्य कन्सिस्टन्सी नसल्यास ढोकळा फुगत नाही आणि चवही बिघडते.
  • ईनो जास्त वेळ ठेवल्यास त्याचा प्रभाव कमी होतो आणि ढोकळा स्पॉंजी राहत नाही.
  • जास्त वाफवल्याने ढोकळा कोरडा आणि कडक होतो.
  • फोडणीसोबत गोडसर पाणी घातल्याने ढोकळा अधिक मऊ  राहतो.
Relationship Tips: नातं तुटण्याआधी दिसतात ‘हे’ रेड फ्लॅग्स! टॉक्सिक रिलेशनशिपची सुरुवात ओळखा, वेळेत वाचवा नातं

Web Title: Soft spongy easy gujarati dhokla recipe marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.