Mobile Phone Theft
गुरुग्राममधील एका आरोपीने दिवसाढवळ्या, एका दुचाकीवरुन धावत्या ऑटो-रिक्षातून एका महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला आणि वाहतुकीतून सुसाट पळ काढला. हा गुन्हा इतक्या सफाईने केला की, त्या महिलेला स्वताला सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नाही. ही संपूर्ण घटना मागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली आहे.
गुरुग्राममधील इफ्को चौक मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली असून व्हिडिओमध्ये एक ऑटो-रिक्षा वाहतुकीतून जाताना दिसत आहे. त्याचवेळी, दुचाकीवरील एक तरुण ऑटो-रिक्षाच्या मागच्या कारला ओव्हरटेक करून वेगाने जवळ जात होता. दुचाकीस्वाराची नजर त्या महिलेच्या मोबाईल फोनवर होती. ऑटो-रिक्षाजवळ पोहोचताच, त्याने महिलेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तो तेथून पळाला.
वीडियो गुरुग्राम के इफको चौक का है जहां चलते ऑटो से महिला का मोबाइल छीनकर बाइक सवार बदमाश फरार हो गए. पूरी वारदात वहां से गुजर रहे एक कार के डैशकैम में कैद हो गई. https://t.co/knxnXPDhj5 — Kishor Joshi (@KishorJoshi02) November 5, 2026
या चोराने मोबाईलफोन हिसकावून घेतला तो क्षण सुध्दा थक्क करणारा होता. या घटनेत आरोपीने ना बाईक थांबवली, ना कोणतीही घाई केली. ऐवढ्या भरधाव वाहतुकीत त्याने काही सेकंदातच मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि वेगाने पुढे निघून गेला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे ऑटो-रिक्षातील महिला घाबरली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहराच्या वाहतुक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा या चोराने भरदिवसा, वर्दळीच्या रस्त्यावर मोबाईल फोन हिसकावून फसार होतो. यामुले अनेक प्रश्न निर्माण होतात. बाईकवरून आलेल्या गुन्हेगाराने इतक्या सहजपणे हा गुन्हा करून फसार झाला. व्हायरल व्हिडिओमुळे गुरुग्राममधील पादचाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान उभे झाले आहे.
Ans: गुरुग्राममधील इफ्को चौक मेट्रो स्टेशनजवळ
Ans: ३१ ऑक्टोबर रोजी घटना घडली.
Ans: धावत्या ऑटो-रिक्षाजवळ जाऊन त्यात बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि वेगाने पळ काढला.






