Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spicy Food Effects: मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? जाणून घ्या ‘तिखट’ सत्य!

Spicy Food Effects: भारतीय जेवणात तिखट पदार्थांना विशेष स्थान आहे. मिरचीतील कॅप्सायसिन या घटकामुळे तिखटपणा आणि उष्णता जाणवते. मात्र प्रत्येकाची तिखट सहन करण्याची क्षमता वेगळी असते. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने काही लोकांना पोटात जळजळ, आम्लपित्त, ॲसिड रिफ्लक्स, पोटदुखी किंवा जुलाब यांसारखा त्रास होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 06:23 PM
Spicy Food Effects: मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Spicy Food Effects: मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मिरचीतील कॅप्सायसिनमुळे तिखटपणा जाणवतो
  • जास्त तिखटामुळे आम्लपित्त आणि पोटात जळजळ होऊ शकते
  • काहींना पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रासही होऊ शकतो
Chilli Effects on Stomach: भारतीय जेवणात तिखटाला वेगळीच जागा आहे. साधी भाजी असो, झणझणीत मिसळ असो किंवा एखादी चटपटीत चाट मिरचीचा ठसका आला की जेवणाची मजाच बदलते. काही लोकांना जेवणात तिखट कमी असेल तर पदार्थ बेचव वाटते. मात्र जी मिरची जेवणाची चव वाढवते, तिचं प्रमाण जास्त झालं तर पोटासाठी ती त्रासदायकही ठरू शकते. मिरचीमध्ये ‘कॅप्सायसिन’ नावाचा घटक असतो. याच घटकामुळे मिरची खाल्ल्यावर तोंडात आग लागल्यासारखी किंवा शरीरात उष्णता जाणवल्यासारखी भावना निर्माण होते. प्रत्येकाची तिखट सहन करण्याची क्षमता वेगळी असते. एखाद्याला भरपूर तिखट खाल्लं तरी काही होत नाही, तर दुसऱ्याला थोडीशी मिरचीही त्रास देऊ शकते. Spicy Food Effects

तिखट खाल्ल्यावर पोट का बिघडतं?

जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर सर्वात आधी तोंड किंवा घशात जळजळ जाणवू शकते. काही वेळाने पोटातही त्याचा परिणाम जाणवतो. विशेषतः ज्यांचं पोट संवेदनशील आहे, त्यांना तिखट जेवणानंतर अस्वस्थ वाटण्याची शक्यता जास्त असते.

काही लोकांना आम्लपित्ताचा त्रास होतो. छातीत आग होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात जळजळ जाणवणे अशी लक्षणं दिसू शकतात. तिखट पदार्थ काही व्यक्तींमध्ये आधीपासून असलेला ॲसिड रिफ्लक्स वाढवू शकतात.

याशिवाय, खूप मिरची खाल्ल्यानंतर काही जणांना पोटदुखी किंवा जुलाबही होऊ शकतात. आतड्यांवर होणाऱ्या परिणामामुळे शौचाला वारंवार होण्याची समस्या काही लोकांना जाणवते. त्यामुळे तिखट खाल्ल्यानंतर शरीर काय संकेत देतंय, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

प्रत्येकाला सारखा त्रास होतोच असं नाही

तिखट पदार्थ म्हणजे ते नेहमीच वाईट, असं म्हणता येणार नाही. खरी गोष्ट आहे ती प्रमाणाची आणि आपल्या शरीराची. काही लोक वर्षानुवर्षे मसालेदार जेवण खातात आणि त्यांना कोणतीही अडचण जाणवत नाही. दुसरीकडे, काहींचं पोट लवकर बिघडतं.म्हणून दुसऱ्याला तिखट चालतं म्हणून आपणही तेवढंच तिखट खावं, असा नियम नाही. आपल्या शरीराची क्षमता ओळखणं जास्त महत्त्वाचं आहे.

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तिखट आवडत असेल तर काय काळजी घ्यावी?

तुम्हाला झणझणीत पदार्थ आवडत असतील, तर ते पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. मात्र, जेवणात मिरचीचं प्रमाण आपल्या शरीराला सहन होईल इतकंच ठेवणं चांगलं. एकाच वेळी खूप तिखट पदार्थ खाण्यापेक्षा कमी प्रमाणात खाणं अधिक योग्य ठरू शकतं.

हॉट सॉस, चटण्या आणि बाजारात मिळणारे तयार मसाले वापरताना देखील जरा सावध राहा. अशा पदार्थांमध्ये मिरचीसोबत मीठ आणि इतर घटकांचं प्रमाणही जास्त असू शकतं. त्यामुळे प्रत्येक जेवणात त्यांचा भरपूर वापर करण्याची सवय टाळलेली बरी.

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

विशेषतः तिखट खाल्ल्यानंतर वारंवार पोटदुखी, जळजळ किंवा जुलाब होत असतील, तर त्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. काही दिवस मसालेदार पदार्थ कमी करून फरक पडतो का, हे पाहता येईल.

Web Title: Spicy food effects how too much chilli can affect your stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestlye tips
  • lifesytle news

संबंधित बातम्या

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
1

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य
2

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.