
दिवसाची सुरुवात होईल आनंदाने! सकाळच्या धावपळीमध्ये नाश्त्यासाठी बनवा चविष्ट दही सँडविच
दिसवाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने होण्यासाठी नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच खूप जास्त घाई असते. घाईच्या दिवशी नाश्त्यात चहा चपाती किंवा चहा बिस्कीट खाल्ले जाते. पण पदार्थ खाऊन पोट तर भरत नाही पण याउलट शरीरात ऍसिडिटी वाढतो. म्हणूनच नाश्त्यात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सँडविच बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. भाज्या खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये दही सँडविच बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सध्या जेवणाची चव वाढवेल झणझणीत अन् चटपटीत ‘मसाला मिरची’; जाणून घ्या रेसिपी