Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारच्या जे. जे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबईतील राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात सर्व आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे या रुग्णालयात उपचार घेण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच मुंबईच्या जे जे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वरित्या पार पडली. डाॅ. पल्लवी सापळे, हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ.नादिर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वरित्या पार पडली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2024 | 12:07 PM
युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान

युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्य सरकार संचालित जे जे रुग्णालय आपला 180 वा वर्धापन दिन साजरा करत असताना, जे जे रुग्णालयाच्या नावावर रुग्णांच्या उपचाराशी संबंधित आधुनिक कामगिरीही जोडली जात आहे. याबाबत जे जे रुग्णालयाने आणखी एक यश संपादन केले आहे. रुग्णालयात पहिल्यांदाच महिलेचा अर्धा गुडघा बदलण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे ही महिला लवकरच चालण्यास सुरुवात करणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुंबईतील रहिवासी असलेल्या हीराबाई नावाच्या 50 वर्षीय महिलेला एका वर्षाहून अधिक काळ डाव्या पायाच्या गुडघ्याच्या एका भागात वेदना होत होत्या. वेदना इतकी असह्य होती की या महिलेला चालणे कठीण झाले. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात आणले. रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी ठरेल हानिकारक, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी अत्याधुनिक तंत्रज्ञान

हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ.नादिर शाह यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान महिलेच्या गुडघ्याचा एक भाग खराब झाल्याचे आढळून आले हाेते. महिलेचे वय लक्षात घेऊन तिच्या गुडघ्याचा खराब झालेला भाग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक नवीन तंत्र वापरण्यात आले, ज्याला वैद्यकीय भाषेत युनिकाँपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा युनिकॉन्डायलर नी आर्थ्रोप्लास्टी असेही म्हणतात. गुडघ्याचा एकच भाग सदोष असताना ही शस्त्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये, खराब झालेले हाड काढून टाकले जाते आणि त्या भागात कृत्रिम सांधे (प्रोस्थेटिक) बसवले जातात. या तंत्राद्वारे महिलेचा गुडघा अर्धवट बदलण्यात आला. जेजे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

यात रुग्णाला वेदनाही कमी होतात. अर्धवट गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया खूप प्रभावी आहे. विशेषत: तारुण्यात, जेव्हा सांधे खराब होतात, तेव्हा खराब झालेला भाग गरजेनुसार बदलला जातो. नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण गुडघ्याची ओपन सर्जरी करण्याऐवजी फक्त सांधे खराब झालेला भाग बदलता येताे. त्यामुळे रुग्णाची प्रकृतीही लवकरात लवकर ठीक होते आणि काही वेळातच तो चालण्यास सक्षम होतो. या शस्त्रक्रियेमध्ये कमी रक्तस्त्राव होतो आणि गुडघा लवकरात लवकर बरा हाेताे. या सर्जरीला खासगी रुग्णालयात चार ते पाच लाख खर्च येताे पण जे.जे. रुग्णालयात महात्मा ज्याेतिबा फुले आरोग्य याेजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येते – डॉ. नादिर शाह (प्रमुख अस्थिव्यंग विभाग, जे.जे. रुग्णालय)

हे देखील वाचा: आंघोळ करताना या 5 चुका चुकूनही करू नका..

जे.जे. रुग्णालयासाठी अभिमानास्पद बाब 

जे.जे. रुग्णालय 180 व्या वर्धापन वर्ष साजरे करत आहेत. यात अस्थिव्यंग विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानेने केलेली शस्त्रक्रियाही जे.जे. रुग्णालयासाठी अभिमानास्पद बाब आहे. जे.जे. रुग्णालयात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल हाेत असतात. या रुग्णांना येाग्य व अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासना कटीबद्ध आहे – डाॅ. पल्लवी सापळे ( अधिष्ठाता जे.जे. रुग्णालय)

Web Title: State government first half knee replacement surgery successful in j j hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 10:13 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • J J Hospital Mumbai

संबंधित बातम्या

२०५ औषधांचे नमुने अयशवस्वी! खोकला- ताप, हृदयरोगाच्या असंख्य औषधांचा समावेश, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोळ्या
1

२०५ औषधांचे नमुने अयशवस्वी! खोकला- ताप, हृदयरोगाच्या असंख्य औषधांचा समावेश, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोळ्या

वाढत्या स्क्रीन टाईममुळे फक्त ६ तासांची झोप होते? आरोग्यासंबंधित उद्भवेल ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर
2

वाढत्या स्क्रीन टाईममुळे फक्त ६ तासांची झोप होते? आरोग्यासंबंधित उद्भवेल ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘गरोदर न राहण्यासाठी Contraceptive Pill घेतली, मी आई नाही का होऊ शकणार?’, मुलीच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य
3

‘गरोदर न राहण्यासाठी Contraceptive Pill घेतली, मी आई नाही का होऊ शकणार?’, मुलीच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य

आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन
4

आतड्यांमध्ये जमा झालेला मल क्षणार्धात पडून जाईल बाहेर! आरोग्य सुधारण्यासाठी नियमित करा ‘या’ फळांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.