शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर 'ही' लक्षणे दिसतात
काहींना सतत गोड किंवा काही खाल्ल्यानंतर साखर खाण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सतत साखरेचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे वजनात झपाट्याने वाढ होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह किंवा इतर आजार होऊ शकतात. वजन वाढल्यानंतर पोटावर अतिरिक्त चरबी वाढण्यास सुरुवात होते.
कप केक, बिस्कीट, मिठाई, चॉकलेट इत्यादी पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होऊ शकतात. त्यामुळे आहारात कमीत कमी साखरेचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साखरेचे अतिसेवन केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात, याबद्दल सांगणार आहोत. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आंघोळ करताना या 5 चुका चुकूनही करू नका..
ठराविक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरात सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा वाटणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे रोजच्या आहारात आणि इतर वेळी कमीत कमी प्रमाणात साखरेचे सेवन करावे.
शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर सतत झोप येऊ लागते. सतत झोप येत राहिल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. काम करण्याची इच्छा होत नाही. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
शरीरात साखरेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर ‘ही’ लक्षणे दिसतात
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरात सर्वच घटक एकसमान लागतात. त्यामुळे साखरेची पातळी वाढल्यानंतर फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात साखरेचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात साखर किंवा साखर युक्त पदार्थ खाल्यामुळे नॉन-अल्कोहोल फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो.
हे देखील वाचा: पोटावर वाढलेली चरबी करण्यासाठी जिमला जाण्याऐवजी घरीच करा ‘ही’ आसन, पोटावरील चरबी होईल गायब
शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर हळूहळू त्वचेवरील तेज निघून जाते. त्वचेवरील तेज निघून गेल्यामुळे चेहऱ्यावर अनेक डाग, पिंपल्स किंवा पुरळ येऊ लागतात. त्वचा सुंदर ताज़ीटवटवीत ठेवण्यासाठी कमी कमीत साखरेचे आहारात सेवन करावे.