Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

वय वाढल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोषक आहार, शांत झोप आणि मानसिक आरोग्य चांगले राहिल्यास वाढत्या वयात सुद्धा कायमच हेल्दी आणि फिट दिसाल. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 08, 2026 | 08:03 AM
वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा 'हे' खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा 'हे' खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

Follow Us
Follow Us:

वाढत्या वयात उद्भवणाऱ्या समस्या?
शरीर निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?
आहारात कोणते पदार्थ खाल्ल्यास शरीर निरोगी राहते?

वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. हाडांमध्ये वेदना, सतत वाढलेले आजारपण, मानसिक तणाव, चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा पिंपल्स येणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्या वाढू लागतात.कारण या वयात शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी जास्त होत असते ज्याच्या परिणामामुळे शरीरात गंभीर बदल होतात. त्यामुळे वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर शरीराला पोषणाची फार आवश्यकता असते. वय वाढल्यानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते, हृदयाचे आरोग्य किंवा शरीरातील इतर अवयवांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करणे फार गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – istock)

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

स्नायूंची ताकद, हाडांचे आरोग्य, पचनसंस्था सुरळीत चालू राहण्यासाठी शरीराची काळजी घेणे फार आवश्यक असते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात जंक फूड, स्ट्रीट फूड किंवा वारंवार तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन न करता शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करावे. शरीराला पोषण देण्यासाठी कोणत्याही महागड्या अन्नपदार्थांची किंवा सप्लिमेंट्सची अजिबात आवश्यकता नाही. सहज पचन होणारे पदार्थ खाल्ल्यास आरोग्य चांगले राहील. आज आम्ही तुम्हाला वाढत्या वयात सुद्धा हेल्दी आणि तरुण राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर खाल्ल्यास कायमच निरोगी राहाल.

ग्रीक योगर्ट:

वयाच्या पन्नाशीनंतर डॉक्टरसुद्धा आहारात ग्रीक योगर्ट खाण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये असलेल्या घटकांमुळे पचनक्रिया मजबूत राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. एका कप ग्रीक योगर्टमध्ये सुमारे १७ ग्रॅम प्रथिने असतात, त्यामुळे हाडांना आवश्यक पोषण मिळते. यामध्ये असलेले जिवंत प्रोबायोटिक्स पचनसंस्थेतील बॅक्टेरियांचा समतोल राखण्यास मदत करतात. याशिवाय पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात.

डाळी आणि कडधान्ये:

रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा. डाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येते आणि पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी डाळी आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. सूप, सॅलड किंवा नेहमीची आमटी बनवून सुद्धा खाऊ शकता.

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

बेरीज:

लहान आकाराच्या चवदार बेरीज शरीरासाठी वरदान आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी यांसारख्या फळांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आढळून येते, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी बेरीजचे सेवन करावे. अक्रोड आणि बेरीज एकत्र खाल्ल्याने मेंदू आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही. याशिवाय आहारात फळे, भाज्या, होल ग्रेन्स, हेल्दी फॅट्स आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या ५० वर्षांनंतर आतड्यांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, सुकामेवा आणि बिया यांसारखे फायबरयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

  • Que: फायबरयुक्त पदार्थ आतड्यांसाठी कसे फायदेशीर ठरतात?

    Ans: फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास, मल मऊ ठेवण्यास आणि नियमित शौचास मदत करू शकते.

  • Que: ५० वर्षांनंतर पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Stay fit and healthy even at the age of 50 regularly consume these special foods to cleanse your intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:03 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
4

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.