Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेलाचे सरबत बनवण्याची कृती सांगणार आहोत. बेलाचे सरबत आठवड्यातून एकदा प्यायल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2026 | 08:00 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर स्किन केअर किंवा हेअर केअर रुटीनमध्ये ज्याप्रमाणे बदल केला जातो, तसाच बदल आहारात करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण वाढत्या उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते तर काहींना अचानक चक्कर सुद्धा येते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात खूप जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे ऍसिडिटी, अपचन किंवा आरोग्यासंबंधित संमस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेलाचे सरबत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. थंड पदार्थ पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच ताक, कोल्ड्रिंक किंवा कोणताही सोडा आणून प्यायला जातो. पण त्यावेजी घरी बनवलेले बेलाचे सरबत प्यावे. शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलाचे सरबत प्यायले जाते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • बेलाचे फळ
  • थंड पाणी
  • साखर
  • मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • पुदिन्याची पाने
सकाळच्या नाश्त्यात नियमित चहा बिस्कीट खात असाल तर थांबा! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

कृती:

बेलाचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, बेल फळाचे मध्यभागी दोन तुकडे करून घ्या. त्यानंतर त्याच्या आतील गर काढून घ्या.
बेलाचा गर काढून झाल्यानंतर त्यात २ ते ३ ग्लास थंड पाणी घालून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे गर मऊ होईल.
चाळणीवर बेलाचा गर व्यवस्थित गाळून घ्या. बेलाचे सरबत बनवताना मिक्सरचा वापर करू नये. यामुळे बिया रसात मिक्स होतात आणि चव बिघडून जाते.
गाळून घेतलेला गर एका भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ, साखर आणि जिऱ्याची पावडर घालून मिक्स करा.
सगळ्यात शेवटी स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पाने हाताने बारीक करून रसात टाका आणि मिक्स करून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बेलाचे थंडगार सरबत.

Web Title: Stay fresh and hydrated this summer make chilled bael sharbat at home in just minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • food recipe
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
2

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.