Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

Stomach Infection Causes: पावसाळ्यात पोटाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. उलटी, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. परंतु, यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 08:54 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय?
  • पावसाळ्यात पोटाचा संसर्ग का होतो?
  • ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका
पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक वाटते. पण याच काळात पोटाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते. हवेत वाढलेली आद्रता, दूषित पाणी, अन्नामध्ये झपाट्याने वाढणारे जीवाणू आणि स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पचनाशी संबधित समस्या उद्भवतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळ आणि ताप यांसारख्या आजारांना अनेकजण बळी पडतात. परंतु योग्य काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतात. वारंवार पोटात इन्फेक्शन होण्याची कारणे कोणती, जाणून घेऊयात.

Dark Jeans Care: वारंवार धुतल्याने जीन्सचा रंग उडतोय? वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

पावसाळ्यात पोटाचा संसर्ग का होतो?

पावसाच्या पाण्यामुळे अनेकदा पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. तसेच दमट हवामानामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजंतू वेगाने वाढतात. दूषित अन्न किंवा पाणी शरीरात गेल्यास पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

उघड्यावरचे आणि रस्त्यावरील अन्न खाणे

उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांवर धूळ, माशा आणि जंतू सहज बसू शकतात. त्यामुळे अशा अन्नपदार्थांचे सेवन टाळा.

न धुतलेली फळे आणि भाज्या खाणे

फळे-भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय किंवा सोलल्याशिवाय खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढतो.

हात न धुता जेवणे

जेवणापूर्वी आणि स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबणाने हात धुणे ही अत्यंत महत्त्वाची आणि हेल्दी सवय आहे.

शिळे अन्न खाणे टाळा

खूप वेळ बाहेर ठेवलेले अन्न लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे शक्यतो ताजे आणि गरम अन्नच खावे. उरलेले अन्न योग्य प्रकारे साठवून पुन्हा नीट गरम करूनच खावे.

सुरक्षित पाणी पिण्याची सवय लावा

नेहमी उकळलेले, फिल्टर केलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या. बाहेर जाताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवल्यास दूषित पाणी पिण्याचा धोका कमी होतो.

ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका

सतत अतिसार होणे, वारंवार उलट्या होणे, तीव्र पोटदुखी, ताप, अशक्तपणा किंवा शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी करा

पावसाळ्यात ताजे, स्वच्छ आणि घरी बनवलेले अन्न खाण्याला प्राधान्य द्या. पुरेसे पाणी प्या, स्वच्छतेच्या सवयी पाळा आणि अन्न बनवताना तसेच साठवताना स्वच्छता राखा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Morning Headache: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय ‘हे’ संकेत

Web Title: Stomach flu causes symptoms prevention monsoon stomach infection tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • monsoon care
  • stomach
  • stomach health

संबंधित बातम्या

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम
1

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.