
पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? गरम पाण्यात मिक्स करून प्या 'हा' आयुर्वेदिक पदार्थ
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
तुपाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय?
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने व्हावी, असे प्रत्येकाला कायमचं वाटत असते. पण उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. पोटात साचून राहिलेली घाण सहज बाहेर पडून न गेल्यास संपूर्ण दिवस खराब जातो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात जडपणा जाणवणे, ऍसिडिटी, अपचन, उलट्या, मळमळ, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. दैनंदिन आहारात सतत जंक फूड किंवा तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन न होत नाहीत. अन्ननलिकेमध्ये पदार्थांचे कण तसेच राहतात, ज्यामुळे आंबट ढेकर, आम्ल्पित्त यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. (फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. अपचनाचा त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून ऍसिडिटी नियंत्रणात ठेवली जाते. मात्र गोळ्या औषधांच्या सेवनामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी गरम पाण्यात कोणता आयुर्वेदिक पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयाचे नियमित सेवन केल्यास आतड्यांमधील चिकटून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल.
प्रत्येक स्वयंपाक घरात तूप उपलब्ध असते. तुपाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणातील पदार्थ, गोड पदार्थ इत्यादी अनेक गोष्टींसाठी तुपाचा वापर केला जातो. तूप खाल्ल्यामुळे पचनसंस्था सुधारते. यामध्ये नैसर्गिक लॅक्सेटिव्ह गुणधर्म आढळून येतात. गरम किंवा कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमधील ‘लुब्रिकेशन’ वाढते आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. आतड्यांमधील मल मऊ करण्यासाठी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. यामुळे शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आतडे स्वच्छ होतात. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहे. आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी खूप जास्त जोर लावावा लागतो. ही समस्या आठवड्यातील तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ जाणवू लागल्यास आहारात बदल करणे आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. तुपामध्ये असलेले फायबरयुक्त घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
दीर्घकाळ त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी शरीराची पचनक्रिया मजबूत आणि सक्रिय असणे आवश्यक आहे. कारण पचनसंस्था निरोगी असेल तर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे बारीक पुरळ येत नाही. त्वचा कायमच डाग आणि पिंपल्सविरहित राहते. तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि विटामिन ई त्वचेच्या पेशींना आतून पोषण देण्यासाठी मदत करते आणि त्वचा डिटॉक्स करते. थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी गरम पाण्यात तूप मिक्स करून प्यावे.
Ans: वारंवार शौचास न होणे, शौचास जोर लावावा लागणे, आणि विष्ठा कडक व कोरडी होणे याला बद्धकोष्ठता म्हणतात.
Ans: फायबर युक्त पदार्थ, रोज ३० मिनिटे चाला किंवा व्यायाम करा, जेणेकरून आतड्यांची हालचाल सुधारेल.
Ans: बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, पोट फुगणे, आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे