Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

पचनसंस्थेतील अनेक प्रक्रियांमुळे पोटात परिचित गुडगुड आवाज येण्याची शक्यता असते. पेरिस्टॅलिसिस नावाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे पचनमार्गातून अन्न सतत मिसळते आणि पुढे ढकलत जाते. पोटातून आवाज येण्याला वैद्यकीय भाषेत बोरबोरिग्मी असे म्हणतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 12:01 PM
भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील 'या' बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील 'या' बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

Follow Us
Follow Us:

पोटातून गुडगुड आवाज येण्याची कारणे?
भूक लागल्यानंतर पोटातून आवाज का येतो?
पचनसंस्थेत कशामुळे बदल होतो?

जेव्हा तुमचे पोट रिकामे असते किंवा तुम्हाला खूप भूक लागलेली असते, तेव्हा तुमच्या पोटातून गुडगुड असा आवाज येत असल्याचे तुमच्या अनेकदा लक्षात आले असेल. हा आवाज पचनक्रियेचा एक सामान्य भाग आहेत आणि असा आवाज केवळ भूक लागल्यावरच नव्हे, तर कधीही येऊ शकतो. वैद्यकीय भाषेत ‘बोरबोरिग्मी’ (borborygmi) म्हणून ओळखले जाणारे हे आवाज, पोट आणि आतड्यांमधून वायू, द्रव आणि पाचक घटकांच्या हालचालीमुळे येतात.(फोटो सौजन्य – istock)

कडधान्य भिजवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे आतड्यांना पोहचेल हानी, अपचनाच्या समस्या वाढून उद्भवतील गंभीर आजार

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. निधिराज चौहान सल्लागार, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल, फरिदाबाद यांनी स्पष्ट केले की, पचनक्रियेचे वेगवेगळे टप्पे असतात ज्या दरम्यान पोटातून आवाज येऊ शकतो. हे आवाज सहसा निरुपद्रवी असले तरी, जर या सततच्या पोटाच्या आवाजासोबत पचनाची इतर लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आता मुळात पोटात गुडगुड का होते? तर पचनसंस्थेतील अनेक प्रक्रियांमुळे पोटात परिचित गुडगुड आवाज येऊ शकतो.
पोट रिकामं झाल्यानंतर सुमारे ९० ते १२० मिनिटांनी, पचनसंस्था मायग्रेटिंग मोटर कॉम्प्लेक्स (MMC) सक्रिय करू शकते. या काळात होणारे आकुंचन पचनमार्गातून उरलेले अन्नाचे कण, जीवाणू आणि डेड सेल्स पुढे ढकलण्यास मदत करतात. पोटातील अन्नाचे प्रमाण कमी झाल्यावर, हवा आणि द्रवपदार्थ देखील आवाज करतात, ज्यामुळे भुकेशी संबंधित विशिष्ट गडगडाट ऐकू येतो.

जेवणानंतरही पोटातील आवाज येत राहिल्यास, ते पेरिस्टॅलिसिस नावाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होते, जे पचनमार्गातून अन्न सतत मिसळते आणि पुढे ढकलते. जेव्हा जड अन्न, पचणारे अन्न आणि हवा आतड्यांमधून जातात, तेव्हा ते घुरघुर आणि गडगडाटासारखे आवाज निर्माण करू शकतात. त्यामुळे, जेवणानंतर हे आवाज ऐकू येणे हे चिंतेचे कारण असेलच असे नाही.

तसंच दिवसभरात गिळलेल्या हवेच्या प्रमाणाचा देखील पोटातील आवाजावर परिणाम होऊ शकतो. घाईने जेवल्याने, च्युइंगम चघळल्याने किंवा स्ट्रॉने पाणी प्यायल्याने व्यक्ती जास्त हवा गिळू शकते. तणावामुळे आतड्यांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. पचनसंस्था आणि मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत. यामुळे पोटातील गुडगुडणे किंवा इतर आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येऊ शकतात.

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

बहुतेक प्रकरणांमध्ये, पोटातील आवाज हे सामान्य पचन प्रक्रियेचाच एक भाग असतात. पण जर पोटातील गुडगुडण्यासोबत तीव्र पोटदुखी, सतत पोट फुगणे, मळमळ किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी तुम्ही डॉक्टरांंचा सल्ला घेणे उत्तम ठरते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज का येतो?

    Ans: भूक लागल्यावर पोट आणि आतड्यांमध्ये होणाऱ्या स्नायूंच्या हालचालींमुळे आवाज निर्माण होतो. या हालचालींमुळे पचनसंस्थेतील द्रव आणि वायू पुढे सरकतात, त्यामुळे गुडगुड किंवा घरघर असा आवाज ऐकू येऊ शकतो.

  • Que: पोटातून आवाज येणे सामान्य आहे का?

    Ans: होय. पोटातून अधूनमधून आवाज येणे ही सामान्य प्रक्रिया आहे. भूक लागल्यावर किंवा जेवल्यानंतरही आतड्यांच्या हालचालींमुळे असे आवाज येऊ शकतात.

  • Que: पोटातील गुडगुड आवाज जास्त का येतो?

    Ans: रिकाम्या पोटी पचनसंस्थेतील हालचाली अधिक जाणवू शकतात. याशिवाय गॅस, काही पदार्थांचे सेवन, जलद खाणे किंवा पचनातील बदलांमुळेही पोटातील आवाज वाढू शकतो.

Web Title: Stomach rumbling when hungry know why it happens and how your digestive system responds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
1

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
2

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
3

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत
4

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.