Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन

अपचनाच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 08:10 AM
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी 'या' पद्धतीने करा आल्याचे सेवन

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी 'या' पद्धतीने करा आल्याचे सेवन

Follow Us
Follow Us:

पचनक्रिया बिघडण्याची कारणे?
‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन?
अपचनावर घरगुती उपाय?

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. पण काहीवेळा अपचनाच्या वाढत्या त्रासामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात पोटात जडपणा किंवा थकल्यासारखे वाटते. बद्धकोष्ठता वाढल्यानंतर खाण्यापिण्याची अजिबात इच्छा होत नाही. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच होतो. त्यामुळे उठल्यानंतर पोट स्वच्छ होणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीत होणारे बदल, फायबर युक्त पदार्थांचा अभाव, शारीरिक हालचाल, सतत बसून राहणे किंवा अनियमित आणि चुकीच्या वेळी जेवणे करणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता करण्याची इच्छा होत नाही. तासनतास उपाशी राहिल्यामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आल्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. अपचनाचा वाढता त्रास कमी करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ खावेत. यामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच आतड्यांची हालचाल सुलभ चालू राहते.

‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन:

स्वयंपाक घरात आल्यासोबतच लिंबू, मीठ इत्यादी अनेक पदार्थ उपलब्ध असतात. आल्याची चकती घेऊन त्यावर लिंबाचा रस आणि थोडस मीठ टाकून खाल्यास पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होईल आणि शरीरात घाण साचून राहणार नाही. आल्यामध्ये असलेले नैसर्गिक घटक पचनक्रिया सुधारतात. जेवणानंतर पोट फुगणे, गॅस किंवा जडपणा जाणवत असेल आल्याचे सेवन करावे. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात आल्याचा रस मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. लिंबाच्या आंबट चवीमुळे आम्ल्पिताचा त्रास कमी होतो आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी केवळ आल्याचा रस नाहीतर दिवसभर पुरेसे पाणी पिणे, फळे, भाज्या, कडधान्ये आणि इतर तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करणे फार आवश्यक आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय राहते. याशिवाय नियमित चालणे, व्यायाम आणि प्राणायाम करणे फार आवश्यक आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले राहणे फार आवश्यक आहे. शौचाची इच्छा झाल्यानंतर ती वारंवार दाबून ठेवणे शरीरासाठी फार घातक आहे. यामुळे बद्धकोष्ठता वाढते.

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार आलं किंवा लिंबाचा रस पिणे आवश्यक आहे. अन्यथा लिंबाच्या रसाच्या सेवनामुळे सर्दी, खोकला होण्यासोबतच आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा पोटात आग सुद्धा होऊ शकते. बद्धकोष्ठतेचे प्रमाण वाढल्यानंतर कोणतेही घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करणे फार आवश्यक आहे. चुकीची जीवनशैली फॉलो करण्याऐवजी शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उपाशीपोटी आल्याचे सेवन केल्याने पचनक्रियेला फायदा होतो का?

    Ans: आल्यामध्ये जिंजरॉलसारखे जैवसक्रिय घटक असतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रियेला मदत होऊ शकते आणि मळमळ किंवा पोट फुगण्यासारख्या तक्रारींमध्ये काही लोकांना आराम मिळू शकतो.

  • Que: उपाशीपोटी आले कसे खावे?

    Ans: आल्याचा छोटा तुकडा किंवा त्याचे कोमट पाण्यात केलेले सेवन हा एक पर्याय आहे. मात्र प्रत्येकाची पचनक्षमता वेगळी असल्याने सुरुवातीला कमी प्रमाणात घेणे योग्य.

  • Que: आले खाल्ल्याने आतड्यांमधील ‘कुजलेली घाण’ साफ होते का?

    Ans: आतड्यांमध्ये ‘कुजलेली घाण साचते’ ही संकल्पना वैद्यकीयदृष्ट्या अचूक नाही. शरीराची पचनसंस्था आणि आतड्यांची नैसर्गिक हालचाल कचरा बाहेर टाकण्याचे काम करते. आले पचनास मदत करू शकते, पण ते आतडे साफ करणारे डिटॉक्स औषध नाही.

Web Title: Suffering from indigestion try consuming ginger this way on an empty stomach for better digestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • digestion
  • Digestion Problem
  • home remedies

संबंधित बातम्या

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर
1

Healthy Drink: ताकात चिया सीड्स मिक्स करून प्यायल्यास पचन आणि हायड्रेशनसाठी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.